LPG Gas Cylinder Price : आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. महागाईने होरपळलेल्या जनतेला आणखी एक फटका बसला आहे. एक मार्च 2025 रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.
खरे तर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती चेंज होत असतात. यानुसार आजही गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला असून आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे आधीच महागाईने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

खरंतर केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी सरकारकडून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. मात्र आज एक मार्च 2025 रोजी पुन्हा गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. आता आपण या सिलेंडरच्या किमती कितीने वाढल्यात हे पाहुयात.
किती वाढल्यात किंमती?
आज फक्त 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आले आहेत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती म्हणजे 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमती आजही कायम ठेवण्यात आल्या आहेत.
एक मार्च 2025 रोजी लागू झालेल्या नव्या रेटानुसार आता देशाच्या राष्ट्रीय राजधानीत अर्थात दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1,803 रुपयांना मिळेल, जो फेब्रुवारीमध्ये 1,797 रुपयांना मिळतं होता.
त्याचप्रमाणे कोलकाता येथे त्याची किंमत 1,913 रुपये झाली आहे, जी फेब्रुवारीमध्ये 1,907 रुपये होती. हा सिलिंडर आता देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थात मुंबईत 1,755.50 रुपयांना मिळणार आहे, जो फेब्रुवारीमध्ये 1,749.50 रुपयांना मिळत होता.
कोलकातामध्ये 19 किलोच्या निळ्या सिलेंडरची किंमत 1,965.50 रुपये झाली आहे, जी फेब्रुवारीमध्ये 1,959.50 रुपये होती. चेन्नईमध्ये त्याची किंमत आता 1,918 रुपये झाली आहे. म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सात रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती?
14 किलो वजनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती आजही कायम आहेत. ऑगस्ट 2024 पासून यामध्ये कोणताच बदल झालेला नाही. मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडर 802.50 रुपयांना उपलब्ध आहे. दिल्लीत त्याची किंमत 803 रुपये इतकी आहे. लखनऊ मध्ये 840.50, कोलकत्ता मध्ये 829 आणि चेन्नईमध्ये 815.50 रुपयांना हा गॅस सिलेंडर मिळतोय.