१ मार्च २०२५ अहिल्यानगर : सलूनच्या दुकानात कटिंग करण्याकरिता गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचे मुलाचे चौघांनी स्विफ्ट गाडीमध्ये बळजबरीने बसवून अपहरण केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास तपोवन रोड येथे घडली. वैभव शिवाजी नायकोडी (रा. ढवण वस्ती, तपोवन हडको, तपोवन रोड)असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत त्याची आई सीमा शिवाजी नायकोडी (रा. ढवण वस्ती, तपोवन हडको, तपोवन रोड) यांनी २७ फेब्रुवारीला तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव हा २२ फेब्रुवारीला रात्री कटिंग करण्यासाठी तपोवन रोड येथील सलूनच्या दुकानात गेला. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याचा फोनही बंद लागल्याने त्याच्या घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला.

परंतु तो मिळून न आल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत २५ फेब्रुवारी रोजी हरवल्याची नोंद केली. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी वैभव याची चौकशी करीत असताना तपोवन रोड येथे राहणारा अभी गवळी व सनी सलूनच्या दुकानात काम करणाऱ्या मुलांकडून समजले की वैभव कटिंग करून घराकडे जात असताना जेथे आधीच उभे असलेले लपका नावाचा मुलगा (पूर्ण नाव माहित नाही रा. बोल्हेगाव) व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांनी मारुती सुझुकी स्विफ्ट या चारचाकी वाहनामध्ये वैभव यास बळजबरीने बसवून पळवून नेले.
त्यांच्या गाडीचा नंबर ३०२ एवढाच दिसला असे सांगितल्याने वैभव याच्या घरच्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघाविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला