१ मार्च २०२५ करंजी : एक कॉल प्रॉब्लेम सॉल या वाक्या प्रमाणे आमदार शिवाजीराव कर्डिले जनता दरबाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.जनता दरबार सुरू झाल्याची चर्चा दोन दिवसात मतदार संघात वाऱ्यासारखी पसरली आणि जनता दरबारमध्ये होत असलेल्या हाउसफुल गर्दीने येणारे देखील आवक होत आहेत.
पाठीच्या मणक्यावर मुंबई येथे यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर आमदार कर्डिले यांना जवळपास दीड महिना या आजारपणामुळे इच्छा नसतानाही विश्रांती घ्यावी लागली आणि डॉक्टरांनी देखील विश्रांती घ्यावीच लागेल असा सक्तीचा सल्ला दिल्यामुळे महिनाभर जनतेच्या संपर्कातून बाजूला राहिलेले आमदार कर्डिले दोन दिवसापासून पुन्हा एकदा जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करत आहेत.

या जनता दरबाराला मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सकाळी सात वाजल्यापासूनच बुऱ्हानगर येथील आमदार कर्डिले यांच्या निवासस्थानी तरुण वयोवृद्ध महिला भगिनी जेष्ठ असे सर्वच विविध अडचणी सोडवण्यासाठी या जनता दरबारा प्रसंगी उपस्थित राहून आपले प्रश्न सोडून घेत आहेत.आमदार कर्डिले पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी सक्रिय झाल्याची माहिती समजताच मतदार संघातील लोक मोठ्या संख्येने पुन्हा एकदा बुऱ्हानगर येथे येऊ लागले आहेत.
प्रश्न अडचण कोणतीही असो मार्ग निघणारच असा ठाम विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये असल्यामुळे आमदार कर्डिले पर्यंत पोहचल्यानंतर आपली अडचण दूर होणार अशी भावना आणि विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. प्रश्न मार्गी लागल्यानंतर आमदार कर्डिले यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता देखील अगदी बोलकी असते.
जनता दरबारामध्ये प्रश्न केवळ मतदार संघातील विकास कामाचेच मत मांडले जात नाहीत यामध्ये रस्त्याचा प्रश्न, बांधाचा प्रश्न, भाववाटणीचा प्रश्न, एवढेच नव्हे तर मुलीला सासरकडे होणारा त्रास, नवरा दारू पितोय एक नव्हे हजारो विविध वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन येणारे लोक या जनता दरबाराच्या निमित्ताने दिसून येतात आणि विशेष म्हणजे हे सर्व प्रश्न अगदी हमखासपणे निकाली निघतात.
त्यामुळे विभागण्याच्या मार्गावर असलेले कुटुंब देखील गुण्यागोविंदाने एकत्र राहण्याचे काम होते.जनता दरबारात प्रश्न घेऊन आलेल्याना गुण आल्याशिवाय राहत नाही.असे अनेकजन मिश्किलपणे बोलतात. असो सातत्याने लोकांच्या संपर्कात राहणे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकांचे प्रश्न सोडवणे सर्वसामान्य जनता हीच माझ्या जगण्याची ऊर्जा आहे अशी भावना असलेले आमदार शिवाजीराव कर्डिले लोकसेवेसाठी लोक हितासाठी जनता दरबाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने मतदार संघातील सर्वसामान्य कार्यकर्ते शेतकरी लाडक्या बहिणी देखील सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी दक्ष झाले आहेत.