वाईन शॉप चालकाला 2 हजाराची दारू विकल्यानंतर किती नफा मिळतो ? आकडेवारी पाहून तुम्हीही थक्क व्हाल

अनेकजण आवड म्हणून किंवा सवयीचा भाग म्हणून किंवा दुःख विसरण्यासाठी आनंद सेलिब्रेट करण्यासाठी दारु पितात. पण दारू विकणाऱ्या वाईन शॉप चालकाला दारू मागे किती नफा मिळतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही ना मग आज आपण याच बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Published on -

Alcohol Shop Revenue : दारू किंवा सोमरस ही अशी भानगड आहे जी एखाद्याच्या पोटात दोन घोट गेली की तो माणूस झुलायला लागतो. त्याची नशा अशी चढते की, आपण समोरच्याला आपली सगळी संपत्तीसुद्धा लिहून देऊ शकतो. दारू पिल्यानंतर कोणी फारच आनंदी होतं तर कोणी फारच दुखी होतं. तसेच, एखाद्याकडून काही वधवून घ्यायचे असेल तर त्यातही दारू ही औषधाप्रमाणेच मदत करते.

90 ml म्हणजे नाईन्टीचा एक ग्लास घेतल्यानंतर समोरील व्यक्ती पोपटासारखी बोलायला लागते. पण तुम्हाला पोपटासारखी बोलायला लावणारी ही दारू, टेन्शन विसरायला मदत करणारी ही दारू पिऊन अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. यामुळे, दारूचे व्यसन लावून घेऊन नये.

खरेतर, कोणतंही व्यसन हे वाईटच असतं, विशेष म्हणजे दारू पिणाऱ्याला दारूचे व्यसन हे वाईट आहे हे ठाऊक नसतं असं काही नाही. पण तरीही अनेकजण आवड म्हणून किंवा सवयीचा भाग म्हणून किंवा दुःख विसरण्यासाठी आनंद सेलिब्रेट करण्यासाठी दारु पितात.

तुम्ही किराणा दुकानाबाहेर जेवढी गर्दी पाहणार नाही तेवढी गर्दी दारुच्या दुकानाबाहेर दिसते. तळीराम दारू खरेदीसाठी मोठ्या रांगा लावतात. विशेष म्हणजे दारूच्या किमती या इतर सर्व आवश्यक वस्तूंपेक्षा अधिक आहेत.

दारूसाठी सरकारकडून अधिकचा करही आकारला जातो. असे असतानाही तळीराम मात्र काही सुधारत नाहीत. इतर गोष्टींसाठी पैसे नसतील पण मित्राचा फोन आला आणि बसायचं का ? असं म्हटलं की लगेचच बसण्याचा प्लॅन बनतो.

पण दारू विकणाऱ्या वाईन शॉप चालकाला दारू मागे किती नफा मिळतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही ना मग आज आपण याच बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. आज आपण दोन हजार रुपयांची दारू विकल्यानंतर वाईन शॉप चालकाला नेमका नफा किती मिळतो याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

दारू विकल्यानंतर वाईन शॉप चालकाला किती नफा मिळतो ?

खरेतर, सरकारने बहुतांशी वस्तू ह्या जीएसटीच्या कक्षेत आणल्या आहेत. अर्थात सरकारकडून बहुतांशी वस्तूंवर जीएसटीच्या माध्यमातून कर आकारला जातो. मात्र दारूच्या बाबतीत असं घडत नाही दारू ही जीएसटी च्या कक्षेत येत नाही. दारूसाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर आहेत.

कारण की प्रत्येक राज्यात दारूवर कमी जास्त प्रमाणात टॅक्स आकारला जातो. हेच कारण आहे की प्रत्येक राज्यात दारूची किंमत ही कमी जास्त राहते. दारुच्या बॉटलवर एक्साइज ड्युटी आणि वॅट लागत असतो. खरेतर, दारूवर कर आकारण्यासाठी प्रत्येक राज्याची पॉलिसी वेगळी असते.

पण सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर 2 हजार रुपयांच्या बॉटलवर 30 ते 35 टक्के टॅक्स लागत असतो. म्हणजे बॉटलच्या अर्ध्यापेक्षा कमी किंमत सरकारकडे जाते. यानंतर थोडा खर्च वाहतूकीचा येतो.

आणि मग उरलेले पैसे दुकानदाराला मिळतात. इतकी दुकानदाराची कमाई असते. मात्र विदेशी आणि देशी बॉटल्सवर लागणारा टॅक्स सुद्धा वेगळा असतो. मीडिया रिपोर्ट नुसार, वाईन शॉप चालकाला दारू विकून 20 ते 25 टक्के नफा मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe