मुंबई-पुणे प्रवास होणार सुपरफास्ट ! सुरु होणार ताशी 1100 किलोमीटर वेगाने धावणारी ‘ही’ ट्रेन, Mumbai-Pune प्रवासासाठी किती मिनिट लागणार ?

मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज समोर येत आहे. सध्या या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करायचं म्हटलं म्हणजे तीन ते चार तास लागतातच. पण भविष्यात हा प्रवास फक्त 25 ते 30 मिनिटात होऊ शकतो असा दावा केला जात आहे. कारण म्हणजे या मार्गावर आता अकराशे किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी ट्रेन चालवली जाणार आहे.

Published on -

Mumbai-Pune Travel : मुंबई, पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील तीन शहरे. यातील मुंबई ते पुणे दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. या मार्गावर दररोज हजारो नागरिक प्रवास करत असतात. मात्र सध्या स्थितीला मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास तीन ते चार तासांचा वेळ लागतो.

पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की हा प्रवास भविष्यात फक्त 25 मिनिटात पूर्ण होऊ शकतो तर….; कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र सरकार अशा एका प्रकल्पावर काम करत आहे जो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त आणि फक्त 25 मिनिटात पूर्ण होईल आणि यामुळे या दोन्ही शहरा दरम्यान दैनंदिन कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या नव्या प्रकल्पामुळे विमानापेक्षा जलद गतीने प्रवास करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते पुणे दरम्यान हायपरलूप ट्रेन चालवली जाणार आहे. हायपरलूप ट्रेनमुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा एक चांगला आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.

हायपरलुप ट्रेनमध्ये म्हणजेच पॉडमध्ये 24 ते 28 लोक बसू शकतात अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान आता आपण हायपरलूप प्रकल्प नेमका काय आहे याचा आढावा घेणार आहोत आणि मुंबई पुणे व्यतिरिक्त आणखी कोणत्या शहरा दरम्यान हा प्रकल्प सुरू होऊ शकतो या संदर्भातही माहिती जाणून घेणार आहोत.

कसा आहे हायपरलुप प्रकल्प ?

हायपरलूप ट्रेन तब्बल 1100 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकते. म्हणजेच या ट्रेनचा वेग विमानापेक्षा अधिक राहणार आहे. हायपरलुप ट्रेन ही व्हॅक्यूम ट्यूबमध्ये चुंबकीय तंत्रज्ञानाद्वारे चालवली जाणार आहे. ही जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन सुद्धा राहणार आहे.

या ट्रेनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही ट्रेन कमी वीज वापरते आणि पर्यावरणासाठी देखील खूपच पूरक आहे. खरंतर या ट्रेनचे चाचणी 2019 मध्येच यशस्वी झाली आहे. मात्र हे तंत्रज्ञान आणखी सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि यासाठी सरकारकडून मोठी भरीव मदत सुद्धा दिली जात आहे.

दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी हायपरलूप ट्रेनची झलक दाखवली आहे. रेल्वेमंत्र्यांनी या ट्रेनमुळे भारताच्या प्रवासाची पद्धत बदलेल असे म्हटले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हायपरलूप प्रकल्पासाठी आयआयटी मद्रासला दोनदा 1 दशलक्ष डॉलर्सची मदत देण्यात आली आहे आणि पुढेही मदत दिली जाणार आहे.

रेल्वे मंत्रालय आणि आयआयटी मद्रास सध्या हे तंत्रज्ञान आणखी सुधारण्यासाठी एकत्र काम करत आहेत. एकंदरीत आगामी काळात हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होणार आहे आणि प्रवाशांना यामुळे 1100 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

मुंबई-पुण्यासोबतच या शहरांनाही मिळणार हायपरलूप ट्रेन

मुंबई ते पुणे या मार्गावर हायपरलूप ट्रेन चालवली जाणार हे जवळपास सुनिश्चित असल्याचे बोलले जात आहे. मात्र या सोबतच बेंगलुरु आणि चेन्नई दरम्यान देखील ही गाडी चालवण्याची योजना असल्याचे समोर येत आहे.

एकीकडे या ट्रेनमुळे मुंबई ते पुणे हा प्रवास 25 मिनिटात पूर्ण होऊ शकणार आहे, तर दुसरीकडे बेंगलोर आणि चेन्नई दरम्यान ही गाडी सुरू झाली तर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास फक्त 35 ते 40 मिनिटात पूर्ण होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe