LPG गॅस वाचवायचा आहे? ‘या’ ६ टिप्सने सिलेंडर लवकर संपणार नाही !

Published on -

LPG Gas Saving Tips : महागाई वाढत असताना घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सुयोग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. स्वयंपाकासाठी एलपीजी सिलेंडर आवश्यक असला तरी, काही सोप्या सवयी अंगीकारल्यास त्याचा वापर कमी करून अधिक काळ टिकवता येतो. चला, जाणून घेऊया काही उपयुक्त उपाय.ह्या प्रभावी टिप्स वापरल्यास तुमच्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर मर्यादित राहील आणि तो अधिक काळ टिकेल.

१. प्रेशर कुकरचा जास्तीत जास्त वापर करा : प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक केल्याने अन्न पटकन शिजते आणि गॅस कमी खर्च होतो. भाजी, डाळ, तांदूळ किंवा इतर पदार्थ लवकर शिजण्यासाठी कुकर हा सर्वोत्तम पर्याय आहे.

२. स्वयंपाक करताना झाकण वापरा : स्वयंपाक करताना झाकण लावल्यास अन्न अधिक लवकर शिजते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त वेळ गॅस सुरू ठेवण्याची आवश्यकता भासत नाही आणि इंधनाची बचत होते.

३. ओल्या भांड्यांचा वापर टाळा : भांडी स्वयंपाकासाठी वापरण्याआधी कोरडी असल्याची खात्री करा. ओली भांडी तापण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे गॅसचा अपव्यय होतो.

४. मोठ्या प्रमाणात अन्न शिजवा : जर तुम्हाला वारंवार स्वयंपाक करावा लागत असेल तर वेळ आणि गॅस दोन्ही वाचवण्यासाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अन्न शिजवा.

५. नॉन-स्टिक भांडीचा वापर करा : नॉन-स्टिक भांडीमुळे अन्न जळत नाही आणि कमी तेलातही शिजते. तसेच, या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना गॅस कमी लागतो, त्यामुळे गॅस सिलेंडरचा वापर मर्यादित राहतो.

६. थंड पदार्थ थेट गरम करू नका : फ्रीजमधून काढलेले थंड दूध किंवा कोणतेही पदार्थ थेट गॅसवर गरम करण्याऐवजी, त्यांना काही वेळ खोलीच्या तापमानाला येऊ द्या. यामुळे पदार्थ जलद गरम होतात आणि गॅसचा अतिरिक्त वापर टाळता येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe