Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणार आहात का ? मग कोणता फंड तुमच्यासाठी फायद्याचा राहणार? वाचा…

Updated on -

Best Mutual Fund : गुंतवणूकीचा विषय निघाला की अनेक सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजना आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना अधिक प्राधान्य दाखवले जाते. सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा मिळतो मात्र यातून शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या तुलनेत कमी परतावा मिळतो.

हेच कारण आहे की अलीकडे काही जण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. ज्यांना शेअर मार्केटचे फारसे ज्ञान नाही असे लोक मग म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतात. जाणकार लोक सांगतात की म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक ही तुलनेने कमी जोखीम पूर्ण असते. मात्र, असे असले तरी Mutual Fund शेअर बाजारावर आधारित आहे. यामुळे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतानाही काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.

दरम्यान आज आम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. गुंतवणुकीसाठी बेस्ट म्युच्युअल फंडची निवड कशी करायची, Mutual Fund निवडताना कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत? याच साऱ्या मुद्द्यांचा आज आपण आढावा घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्वपूर्ण माहिती विषयी.

म्युच्युअल फंड निवडताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ?

गुंतवणुकीचे उद्दिष्ट समजून घ्या : मित्रांनो, म्युच्युअल फंड निवडताना पहिले तुम्ही तुमचा गुंतवणुकीचा मेन उद्देश काय आहे हे ठरवा. तुमचा उद्देश दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणे आहे की कर बचत करणे आहे की अल्पकालीन फायदा मिळवणे आहे, हे तुम्ही आधी ठरवून घ्या. मग जर तुमचा उद्देश दीर्घकाळात मोठा निधी तयार करायचा असेल तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड निवडा, जोखीम कमी आणि स्थिर उत्पन्न हवं असेल तर डेट फंड निवडा अन कर बचतीसाठी ELSS अर्थातच Tax Saving Fund निवडा.

फंडाचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा : कोणताही म्युच्युल फंड निवडताना लॉन्ग टर्म मधील त्याची कामगिरी पहा. किमान ५ ते १० वर्षांच्या काळात फंडाणे आपल्या गुंतवणूकदारांना किती रिटर्न दिले आहेत हे चेक करा. मात्र भूतकाळातील कामगिरी भविष्यातही कायम राहील याची शाश्वती नसते. पण जर एखादा फंड सातत्याने चांगला परतावा देत असेल तर भविष्यात सुद्धा असा फंड चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवतो. दरम्यान फंडाच्या तुलनात्मक निकालांसाठी त्याच्या बेंचमार्कशी तुलना करा. क्रिसिल रेटिंग आणि Morningstar रेटिंग सुद्धा पाहा.

एक्स्पेन्स रेशो आणि फंड व्यवस्थापन शुल्क बघा : जाणकार लोक सांगतात की, कमी एक्स्पेन्स रेशो असलेले फंड अधिक फायदेशीर ठरतात. म्हणून नेहमी असेचं फंड निवडण्याचा प्रयत्न करा. काही फंड व्यवस्थापक जास्त शुल्क घेतात, त्यामुळे Direct Plan निवडायला हवा असे तज्ञांचे म्हणणे आहे.

रिस्क आणि अस्थिरता समजून घ्या : जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे Large Cap Fund हे कमी जोखीम, स्थिर परतावा देतात. म्हणून ज्यांना जास्त जोखीम घ्यायची नसेल त्यांनी लार्ज कॅप फंड मध्ये गुंतवणूक करायला हवी. तसेच ज्यांची रिस्क घेण्याची तयारी असेल त्यांनी Mid Cap आणि Small Cap Fund निवडायला काय हरकत नाही. यात जास्त जोखीम असते पण दीर्घकाळात चांगला परतावा सुद्धा मिळू शकतो.

एकंदरीत, एका मिनिटात म्युच्युअल फंड निवडण्यासाठी तुम्हाला तुमचे उद्दिष्ट ठरवावे लागेल, जोखीम पचवण्याची क्षमता समजून घ्यावी लागेल, ५-१० वर्षांचा फंडाचा ट्रॅक रेकॉर्ड तपासावा लागेल, एक्स्पेन्स रेशो आणि फंड मॅनेजरची कामगिरी बघावी लागेल अन मग तुम्ही योग्य प्रकारचा फंड निवडू शकता. पण मित्रांनो शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही जोखीम पूर्ण आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा निर्णय हा फक्त तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणूनच कोणत्याही फंडात किंवा स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तुमच्या वैयक्तिक वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe