Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरेतर, या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिना सुरू होऊनहीं अजून पर्यंत महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे महिला वर्ग चिंतेत असून, ग्रामीण भागात लाडकी बहिण योजना बंद झाली की काय अशा सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत.
मात्र आता या योजनेच्या आठव्या हप्त्याबाबत म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या हफ्त्याबाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सोमवारी 3 मार्च 2025 रोजी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महिलांना ज्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या आतुरता होती ती आता लवकरच समाप्त होणार असे दिसते. महत्त्वाची बाब अशी की, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता सोबतच वितरित केला जाणार आहे.
या दोन्ही हप्त्यांच्या वितरणाची तारीख सुद्धा सरकारने निश्चित केली आहे. पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत 3000 रुपये मिळणार की 4200 रुपये मिळणार अन या योजनेचे हे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यात येणार ? याबाबत आता आपण महत्त्वाची माहिती पाहूयात.
कधी मिळणार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ जुलै 2024 पासून दिला जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अन जानेवारी महिन्यांचे हफ्ते वितरित करण्यात आले आहेत.
आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा हप्ता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी विधान परिषदेच्या प्रांगणात दिली आहे.
5 मार्च 2024 पासून या योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असून आठ मार्चपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे म्हणजेच 08 मार्च 2025 पर्यंत या योजनेच्या सर्व महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ मिळणार आहे.
3 हजार रुपये मिळणार की 4200 रुपये
फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ पाच मार्च 2025 पासून वितरित होणार आहे. सध्या या योजनेअंतर्गत 1500 रुपयांचा हप्ता दिला जात आहे. मात्र आगामी काळात या योजनेचा हफ्ता वाढवला जाणार आहे, या अंतर्गत आगामी काळात 2,100 रुपयांचा लाभ मिळणार अशी सरकारने घोषणा केलेली आहे.
यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हफ्त्यासोबत 3,000 मिळणार की 4,200 हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान या योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या लाभापोटी फक्त तीन हजार रुपये मिळणार आहेत. परंतु एप्रिल महिन्यापासून या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 2100 रुपये मिळू शकतात असा दावा होतोय.