Mumbai Pune Expressway Missing Link : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. आपल्या राज्यातही अनेक रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले असून काही रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत.
असाच एक रस्ते विकासाचा प्रकल्प म्हणजेच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प. दरम्यान आता याच प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरे तर हा प्रकल्प मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा बहुमूल्य असा वेळ वाचवणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे या दरम्यानचा प्रवास कालावधी अर्ध्या तासांनी कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरे तर या प्रकल्पाची गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चा सुरु आहे. पण आता हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतो? यासंदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.
काय आहे डिटेल्स
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आलेला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होईल. ऑफिशियल रिपोर्ट असे सांगते की या प्रकल्पाचे 92% काम आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे आणि उर्वरित आठ टक्के काम ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कसा आहे प्रकल्प?
13.3 किमीचा मिसिंग लिंक प्रकल्प खोपोली एक्झिट आणि सिंहगड इन्स्टिट्यूट दरम्यानचे अंतर 5.7 किमीने कमी करणार आहे. सध्या हे अंतर 19.8 km इतक आहे. महाराष्ट्र राज्य रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआरडीसी) यांनी हाती घेतलेल्या या प्रकल्पाचे उद्दीष्ट एक्सप्रेसवेवरील वाहतुकीची गर्दी कमी करणे आहे.
या महामार्गावर सध्या दररोज 60 हजार वाहनांची गर्दी होताना दिसते. शनिवारी आणि रविवारी ही संख्या एका लाखाच्या घरात पोहोचते. खरेतर या प्रकल्पाचे काम 2019 मध्ये सुरू झाले होते. या प्रकल्पाची डेडलाईन सातत्याने वाढवण्यात आली आहे. हा प्रकल्प मार्च 2025 पर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होणार असे म्हटले जात होते.
मात्र आता पुन्हा एकदा या प्रकल्पाची डेडलाईन हुकणार आहे, आता या प्रकल्पासाठी नवीन डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. हा प्रकल्प ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होईल अशी माहिती आता समोर येत आहे. या प्रकल्पासाठी 6,600 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्य
या प्रकल्प अंतर्गत आशियातील सर्वात रुंद बोगदा बांधला जात आहे. याअंतर्गत बांधले जाणारे जुळे बोगदे 23.30 मीटर रुंद आहेत, यातील प्रत्येक बोगद्यात चार लेन आणि एक आपत्कालीन लेन सुद्धा आहे. बोगद्यांपैकी एक बोगदा 8.87 किमी लांबीचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत 650 मीटरचा केबल-स्टेटेड ब्रिज सुद्धा बांधला जात आहे.
हा प्रकल्प घाट विभागाला बायपास करतो. बोगद्यांना एक्सप्रेस वेशी जोडण्यासाठी खोपोलीजवळ दोन पुल बांधले जात आहेत. विद्यमान घाट रस्ता हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही वापरासाठी खुला राहणार आहे. धोकादायक वाहने ही मिसिंग लिंक ऐवजी घाट रस्ते मार्गेच प्रवास करू शकणार आहेत.