DA Hike : मागच्या वर्षी अर्थात 2024 मध्ये होळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली होती. यामुळे यंदा परत एकदा सरकारी कर्मचाऱ्यांना होळीच्या आधी महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार का? हा प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होतोय. दरम्यान महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे येत्या दहा दिवसांनी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. दरवर्षी मार्च महिन्यात होळीचा सण साजरा होत असतो. यंदा होळी सणाला फक्त दहा दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे.

हेच कारण आहे की आगामी दहा दिवसात महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे. खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो.
मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होतो. मात्र मार्च महिन्यापासून सुधारित केला जाणारा महागाई भत्ता हा जानेवारी महिन्यापासून आणि ऑक्टोबर महिन्यात सुधारित होणारा महागाई भत्ता हा जुलै महिन्यापासून लागू केला जातो.
यानुसार येत्या दहा दिवसांनी महागाई भत्ता वाढीचा जो निर्णय होणार आहे तो महागाई भत्ता सुद्धा जानेवारी 2025 पासूनच लागू होणार आहे. दरम्यान, आता आपण जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता कितीने वाढवला जाणार? कोणत्या महिन्याचा पगार सोबत प्रत्यक्षात महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
महागाई भत्ता कितीने वाढणार?
गेल्या वेळी म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता आणि ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% इतका झाला. आता यात पुन्हा एकदा तीन टक्क्यांची वाढ होणार असा अंदाज समोर आला आहे.
एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार दरवर्षी महागाई भत्ता वाढवला जातो आणि यावेळी देखील जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या काळातील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासून चा महागाई भत्ता वाढणार आहे. आतापर्यंत एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजेच 53 टक्क्यांवरून 56 टक्के होणार आहे.
मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळणार लाभ
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% म्हणून 56% होणार असून याचा शासन निर्णय म्हणजे जीआर येत्या दहा दिवसात काढला जाणार अशी शक्यता आहे. येत्या दहा दिवसांनी केंद्रातील सरकारकडून याबाबतचा जीआर निघणार असून जीआर निघाल्यानंतर मार्च महिन्याच्या पगारा सोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.
परंतु ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने संबंधित नोकरदार मंडळीला आणि पेन्शनधारकांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे.