मुंबईकरांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, मार्चअखेरीस ‘हा’ Metro मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार, तिकीट दर कसे असणार ? पहा….

मुंबईतील मेट्रो मार्ग 3 प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरंतर, या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा गेल्या वर्षी सुरु झाला. आता याचा दुसरा टप्पा म्हणजेच बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा 9.8 किलोमीटरचा मेट्रो मार्ग मार्च महिन्यातच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. या दुसऱ्या टप्प्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

Published on -

Mumbai Metro News : मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरांमध्ये सध्या स्थितीला मेट्रो सुरू असून ठाण्यातही लवकरच मेट्रो धावणार आहे. दुसरीकडे मुंबई आणि पुण्यातील मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण देखील सुरू करण्यात आले आहे. अशातच आता मुंबई मेट्रो संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी दक्षिण मुंबईतील नागरिकांसाठी अधिक खास ठरणार आहे.

खरे तर , आता दक्षिण मुंबईमध्ये देखील मेट्रो धावणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईमधील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येईल अशी आशा आहे. मुंबईतील मेट्रो मार्ग 3 प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरंतर, या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा गेल्या वर्षी सुरु झाला.

ऑक्टोबर 2024 मध्ये याचा पहिला टप्पा सुरू झाला होता आणि आता मार्च 2025 मध्ये म्हणजेच या चालू महिन्यात या मेट्रो मार्गाचा दुसरा टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येणार असा विश्वास व्यक्त केला जात असून यामुळे नागरिकांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

खरे तर हा मेट्रो मार्ग ‘ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखला जातो. या मेट्रो 3 चे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या मेट्रो मार्गाची एकूण लांबी ही जवळपास 33.5 किलोमीटर आहे. या मेट्रोचे काम एकूण 3 टप्प्यात केले जात आहे. आरे ते बीकेसी हा 12.4 किलोमीटरचा पहिला टप्पा असून हा टप्पा ऑक्टोबर 2024 मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला होता.

आता याचा दुसरा टप्पा म्हणजेच बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा 9.8 किलोमीटरचा मेट्रो मार्ग मार्च महिन्यातच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. या दुसऱ्या टप्प्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. याठिकाणी सध्या चाचणी सुरू आहे.

म्हणून याचं महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत हा मेट्रोमार्ग दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात आरे ते वरळीपर्यंत गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे. हा प्रवास आता मेट्रोतून करता येणे शक्य होणार आहे. दुसरीकडे, या मार्गाचा शेवटचा टप्पा वरळी ते कफ परेड हा 11.3 किलोमीटर अंतराचा भाग सुद्धा याच वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या मार्गाचा शेवटचा टप्पा हा जुलै 2025 पर्यंत पूर्ण होऊन प्रत्यक्षात यावर वाहतूक सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. म्हणजे आरे ते कफ परेड हा संपूर्ण 33.5 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग या चालू वर्षी मुंबईकरांच्या सेवेत येण्याची दाट शक्यता आहे. विशेष बाब अशी की या मेट्रो मार्गासाठीचे तिकीट दर कसे असू शकतात याबाबतही आता माहिती हाती आली आहे.

तिकीट दर कसे असणार ?

मिळालेल्या माहितीनुसार, आरे ते सिप्झ यादरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 10 रुपयाचे तिकीट काढावे लागणार आहे. आरे ते एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 20 रुपये तिकीट लागणार आहे. तसेच आरे ते टी-2, सहार रोड, टी-2 दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 30 रुपयाचे तिकीट लागणार आहे.

आरे ते सांताक्रुझ, बांद्रा कॉलनी दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 40 रुपयाचे तिकीट लागणार आहे. आरे ते बीकेसी, धारावी, शितला देवी मंदिर, दादर या दरम्यान मेट्रो ने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 50 रुपयाचे तिकीट लागणार आहे. तसेच आरे ते सिद्धिविनायक, वरळी, आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो ने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 60 रुपयाचे तिकीट काढावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News