राहुरीत साडेपाच हजार घरकुले मंजूर ग्रामपंचायतीच्या तांत्रिक चुकांमुळे अडिचशे लाभार्थी वंचित, सर्वांना लाभ देण्याची मागणी

Published on -

राहुरी : तालुक्यातील घरकुल मंजूर झालेल्या जवळपास २५० लाभार्थ्यांना तांत्रिक गडबडीचा बळी ठरवून त्यांच्या घरकुल योजनेतून मिळणाऱ्या घराच्या आशा मावळल्याचे निदर्शनास आले आहे. सन २०२४-२५ या वर्षात राहुरी तालुक्यात विविध गावामध्ये पात्र लाभार्थ्यांना ५७३८ घरकुल शासनाच्या यंत्रणेकडून मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी २५० लाभार्थ्यांनी जॉब कार्ड काढलेले नसल्याने त्यांच्या सर्वेक्षणात इतर नागरिकांचे जॉब कार्ड वापरून सर्वे केल्याने त्यांचे रजिस्ट्रेशन होऊ शकले नाही. त्यामुळे घरकुल मंजूर असूनही त्याचा लाभ संबंधित

गरीब लाभयर्थ्यांना मिळत नसल्याचे दिसून येते. ग्रामपंचायत स्तरावर ज्या ग्रामसेवक व सर्वे करणारे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, त्यांच्या चुकीच्या सर्वे क्षणाचा फटका २५० मंजूर लाभार्थी यांना सहन करावा लागत आहे.

पंतप्रधान घरकुल योजनेतून तब्बल नऊ हजार नागरिकांचे सर्वेक्षण झाले असून, त्यापैकी ५७३८ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. १६३१ लाभार्थी हे कागदपत्राअभावी अपात्र ठरविण्यात आले आहेत, १३८१ लाभार्थी हे

अजूनही वेटिंगला आहेत, परंतु ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर आहेत, त्यांच्याकडे जॉबकार्ड नसल्याने त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्या नागरिकांनी गेली ७ ते ८ वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा केली. घरकुल मंजूर होऊनही त्यांना जॉब कार्डची माहिती न देता घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले. या बेजबाबदार ग्रामपंचायतीचे सर्वे करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लाभाध्यर्थ्यांनी केली आहे. डीआरडी, जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, मुख्याधिकाऱ्यांनी राहुरी तालुक्यातील घरकुल योजनेचा लाभ नागरिकांना मिळू

नये, यासाठी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केली असून त्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच या २५० पात्र लाभाथ्यर्थ्यांना त्यांचे घरकुल प्रकरणे मंजूर असल्यामुळे त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभदेण्यात यावा अशी मागणी केली आहे. तांत्रिकदृष्ट्या घरकुल मंजूर असताना अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभर्थ्यांनी लवकर आम्हाला घरकुल मिळावे, अशी मागणी देखील केली आहे. राहुरी तालुक्याचे प्रतिनिधी याबाबत काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण तालुक्याचे लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe