घडा भरला ! निघोजच्या धोंड्या टोळीला मोक्का !!

Published on -

नगर: विशेष प्रतिनिधी निघोजच्या जत्रा हॉटेल मालकावर सशस्त्र हल्ला, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बैंक ऑफ महाराष्ट्राची रोख रक्कम तसेच दागिण्यांची लुट, साकूर ता. संगमनेर येथील सराफाची लुट यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा मास्टरमाईंड असलेल्या निघोजचा घोड्या व त्याच्या टोळीचा घडा भरला आहे त्यांच्याबर मोळांतर्गत कारवाई करण्यात आली असून तालुक्यातील मिथुन उंबऱ्या काळे याचाही त्यात समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील एकूण २७गुन्हेगारांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून १७ सराईत गुन्हेगारांना एमपीडीएन्वये नाशिक कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

यासंदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार पारनेर, सुपा पोलीस ठाणे तसेच नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार, कॅम्प, नगर तालुका, एमआयडीसी, श्रीगोंदे, बेलवंडी, जामखेड, संगमनेर शरह, अश्वी, शिर्डी, कोपरगांव शहर व तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १७गुन्हेगारांकडून बाळू तस्करी, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यासह अनिशस्त्र व घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, शासकीय कामात अडथळा निर्माण होईल असे गंभीर गुन्हे केले जात होते. त्यांना सर्वसामान्य लोकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणली होती. या गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलीत कायद्यान्वये करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाया अपुऱ्या तसेच कुचकामी ठरत होत्या, त्यावर त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी एमपीडीए कायद्यान्वये

१७ गुन्हेगार स्थानबध्द पोलीस अधीक्षक ओला यांनी आलेल्या प्रस्तावांची छानणी व पडताळणी करून हे प्रस्ताव शिफारस अहवालासह जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे पाठविले. जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १७ गुन्हेगारांना एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबध्द केले.

चार टोळ्यांना मोक्का

सन २०२४ मध्ये संघटीतपणे टोळीने गैर कायद्याची मंडळी जमउन अग्निशस्त्रासह खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, चोरी करणे, जबरी चोरी करणे, सरकारी नोकरास मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, अग्निशस्त्र, घातक हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या चार टोळ्यांविरोधात मोक्का कायद्यांन्वये कारवाई करण्यात आली.

मास्टरमाईंड धोंड्या मात्र फरार !

धोंड्याच्या टोळीने शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर पिस्तुलाचा धाक दाखवत दिवसा ढवळ्या दरोडा टाकला होता. त्यात कोटयावधी रूपयांची रोकड तसेच सोने लुटून नेण्यात आले होते. शिरूर पोलीसांनी धोंडयाला निघोज परिसरातून मुद्देमालासह जेरबंद केले होते. या गुन्ह्यातून सुटून आल्यानंतर त्याचे उद्योग पुन्हा सुरू झाले. निघोज येथील जत्रा हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ल्यानंतर धोंड्या व त्याची टोळी पसार होती. त्याच दरम्यान त्यांनी साकूर ता. संगमनेर येथील सराफाला अलीकडेच लुटले होते. त्यातील काहींना जेरबंद करण्यात आले असले तरी मास्टरमाईंड धोंड्या मात्र फरार आहे.

धोंड्याच्या टोळीची दहशत

निघोज परिसरात धोंड्याच्या टोळीची दहशत आहे. जवळे, निघोज पासून देवीभोयरे फाट्यापर्यंतचे अवैध व्यवसायिक, हॉटेलचालक यांच्याकडून दरमहा खंडणी वसुलीचे काम या टोळीकडून करण्यात येत होते. जत्रा हॉटेलवरील मारहाणीनंतर ही वसुली बंद झाली असली तरी टोळीची दहशत मात्र कायम आहे. टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई झाल्याने व्यवसायिकांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला आहे.

हे आहेत टोळ्यांचे म्होरके !

निघोज, ता. पारनेर येथील जत्रा हॉटेलवर जेवणाच्या बिलाच्या कारणावरून तलवार, लाकडी दांडके व कोयत्याने गंभीर जखमी करून खुनाचा प्रयत्न करणा-या सागर उर्फ धोंड्या महादू जाधव, सुपा, पारनेर येथील मिथुन उंबऱ्या काळे, तिसगांव, ता. पाथर्डी येथील मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांच्या घरावर दरोडा टाकून हत्या करणारे उमेश रोशन भोसले या टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

प्रस्ताव तयार करू उपविभागीय पोलीस अधिकारी, अपर पोलीस अधिकाऱ्यांनी एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलीस अधिकारी अपर पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आले होते. चार टोळयांसह २७ सराईत गुन्हेगाराविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ च्या कलमांतर्गत प्रस्ताव तयार करून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पाठविण्यात आले होते. त्यांनी या टोळयांवर मीका कायद्यान्वये कारवाई केली. गेल्या वर्षभरात अधिक्षक ओला यांनी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलवार यांनी परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe