पेट्रोल आणि डिझेल कार ओळखायची आहे? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरा!

Published on -

आजच्या काळात विविध प्रकारच्या इंधनांवर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर दिसतात, जसे की पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनं. इलेक्ट्रिक वाहनं ओळखणं अगदी सोपं असतं, कारण त्यांचा वेगळा डिजाईन आणि चार्जिंग पोर्ट असतो. मात्र, अनेक वेळा लोक पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या गाड्यांमध्ये गोंधळून जातात. पार्क केलेली किंवा चालणारी कार पेट्रोलवर चालते की डिझेलवर, हे ओळखण्यासाठी काही सोपे आणि उपयुक्त मार्ग आहेत.

बॅज किंवा स्टिकर तपासा

बहुतेक वाहन उत्पादक त्यांच्या डिझेल कारच्या मागील बाजूस किंवा फ्यूल लिडवर “डीझेल” असं बॅज किंवा स्टिकर लावतात. तर पेट्रोल कारवर “TSI” (Turbocharged Stratified Injection) किंवा “VVT” (Variable Valve Timing) असे चिन्ह असते. डिझेल कारमध्ये “TDI” (Turbo Diesel Injection) किंवा “CRDi” (Common Rail Direct Injection) यासारखी चिन्हे असतात.

एक्झॉस्टमधून निघणाऱ्या धुरावर लक्ष द्या

डिझेल इंजिन असलेल्या कारच्या एक्झॉस्टमधून तुलनेत अधिक धूर बाहेर पडतो, विशेषतः गाडी वेगाने चालवली किंवा अचानक एक्सलरेशन दिलं गेलं तर हा धूर अधिक स्पष्ट दिसतो. डिझेल कार गडद काळसर धूर सोडतात, तर पेट्रोल कार तुलनेने कमी आणि हलका पांढरट धूर सोडतात. त्यामुळे एक्झॉस्टचा रंग आणि प्रमाण यावरूनही तुम्ही वाहन ओळखू शकता.

इंजिनचा आवाज आणि स्मूथनेस

पेट्रोल कारचं इंजिन तुलनेने गुळगुळीत आणि शांत असतं. त्यामध्ये कमी कंपन (vibrations) जाणवतात आणि इंजिन आवाजही मृदू असतो. याउलट, डिझेल इंजिन तुलनेने जड आणि आवाज जास्त असतो. गाडी सुरू करताना किंवा वेग वाढवत असताना डिझेल इंजिन अधिक मोठा आवाज करतं.

मायलेज आणि पॉवर

पेट्रोल आणि डिझेल इंजिन ओळखण्यासाठी मायलेज आणि पॉवर यावरही लक्ष देता येतं. पेट्रोल कार तुलनेत अधिक पॉवर जनरेट करतात, त्यामुळे त्या वेगाने पिक-अप घेतात आणि अधिक स्मूथ चालतात. मात्र, डिझेल इंजिन असलेल्या गाड्या अधिक मायलेज देतात, त्यामुळे त्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक फायदेशीर ठरतात.

देखभाल खर्च आणि प्रदूषण

डिझेल कारचे मेंटेनन्स खर्च तुलनेने जास्त असतात, कारण डिझेल इंजिनच्या पार्ट्सची देखभाल आणि बदल अधिक खर्चिक असते. त्याचबरोबर, डिझेल गाड्या तुलनेने अधिक प्रदूषण करतात, तर पेट्रोल इंजिन कार तुलनेने स्वच्छ आणि कमी प्रदूषण करणाऱ्या असतात.

जर तुम्हाला एखादी कार पेट्रोल आहे की डिझेल, हे ओळखायचं असेल, तर वरील काही साध्या पद्धती वापरून तुम्ही सहज त्याचा अंदाज लावू शकता. गाडीचा बॅज, एक्झॉस्टमधून निघणारा धूर, इंजिनचा आवाज, मायलेज आणि देखभाल खर्च यावर लक्ष ठेवून पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमध्ये फरक ओळखणं अगदी सोपं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe