७ मार्च २०२५ पाथर्डी : मस्साजोग घटनेतील विशी, बावीशीच्या वयातील आरोपी इतके क्रूर कसे होतात याचे जिवंत उदाहरण आता पाथर्डीच्या अल्पवयीन टोळीच्या माध्यमातून समोर येत आहे. सराईत गुन्हेगारांकडून अशा अल्पवयीन टोळ्यांना सपोर्ट मिळत असल्याने बाल गुन्हेगारांना या तथाकथीत गुन्हेगारी वृत्तीचे राजकीय आश्रय असलेल्या गुंडाचे आकर्षन वाटल्याने अशा घटना घडत आहेत.
त्यातूनच पाथर्डीच्या अल्पवयीन टोळीची विविध अंगानी चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे राज्य समन्वयक सुभाष केकाण बांनी केली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षकांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी पोलीस ठाणयात नोंद क्र. २३ दि. ३/३/२०२५ रोजी झालेल्या गुन्हयाच्या अनुषंगाने शहरात अल्पवयीन टोळीच्या दहशती निर्माण झालेल्या आहेत. या टोळ्यांना सराईत गुन्हेगार आश्रय देतात.

गावठी कट्टे, चाकू, तलवारी पुरवल्या जात आहेत. अल्पवयीन मुलांच्या हातून गंभीर गुन्हे सराईत गुन्हेगाराकडून केली जात आहेत. वसतीगृहातील अल्पवयीन मुलाला मारहान करण्याचा प्रयत्न देखील अशा टोळ्याकडून झालेला आहे. त्यामुळे अशा टोळ्यांचे म्होरके असलेल्या व या गुन्हयातील अल्पवयीन गुन्हेगारांच्या पाठीमागे कोणाचे पाठबळ आहे याचा शोध पोलीसांना घ्यावा.
यासाठी मुद्दानिहाय चौकशीची मागणी करुन या गुन्हयात समावेश असलेल्या सर्व अल्पवयीन गुन्हेगारांचे सोशल मिडीया, इंस्टा ग्राम, फेसबुक अकाऊंट तपासून पहावे. त्यांचे व रेकॉर्डवर असलेले गुन्हेगारांचे फोटो, रिल्स तपासून पहावे. त्या संबंधाने त्यांचे कॉल रेकॉर्डस, गुन्हयाच्या बाबतीत चौकशी करावी.
मिडीयाच्या प्लॅटफॉर्मवर जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांचे घरझडती घ्यावी. त्यांची चौकशी करावी. सुमारे १०० पेक्षा अधिक गावठी कट्टे पोलीसांना आढळतील. तसेच विविध प्राणघातक शस्त्र, तलवारी चाकू देखील आढळून येतील.
या गुन्हयातील मुलाकडे असलेले महागडे मोबाईल बाबत चौकशी करावी. मोबाईल कधी, कुठून घेतले. त्यासाठी मुलांचे व त्यांच्या आई वडीलांचे आर्थीक व्यवहार, बैंक स्टेटमेंट तपासावे. असे मोबाईल सराईत टोळ्यांच्या म्होरक्याकडून दिले जातात. त्या बदल्यात अल्पवयीन गुन्हेगाराकडून चोरी, रॉबरी, तसेच गंभीर प्रकारचे गुन्हे करुन घेतले जात असल्याची माहीती आहे. त्याची चौकशी व्हावी.
गुन्हयातील सर्व मुलांचे मागील सहा महिन्याचे कॉल रेकॉर्डस तपासून त्यांचा कोणत्या सराईत गुन्हेगारासोबत संपर्क आहे त्याची कारणे व त्या काळातील काही गुन्हे घडले असल्यास त्याचा शोध घेवून चौकशी करावी. गर्भगिरी वसतीगृहातील मुलांना मारहान झालेनंतर त्यांचे कोणाशी संपर्क झाले. गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यावर २२ तास फिर्याद देण्यास उशीर का झाला, विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे.
म्हणून पोलीस संरक्षण मिळणेसाठी वसतीगृहाच्या वतीने अर्ज दिला होता. अर्जाची पोहोच देखील पोलीस ठाण्यात दिली जात नाही. त्याची देखील चौकशी होवून पोहोच न देणाऱ्या ठाणे अंमलदार हे. कॉ. बडे यांची चौकशी करावी. या गुन्हयातील अल्पवयीन गुन्हेगाराची सराईत टोळी आहे. त्यामुळे वसतीगृहात पुन्हा मारहान अगर गंभीर बाब घडू शकते.
विद्यार्थ्यांच्या तसेच अधिक्षक, कर्मचारी व संस्था पदाधिकारी यांच्या जिवीतास धोका होवू शकतो म्हणून वसतीगृहाला पोलीस संरक्षण द्यावे असे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष राम लाड, जिल्हा सहसचीव शहादेव गर्जे, अल्पसंख्याक आपचे अध्यक्ष आय्याश शेख यांच्या सह्या आहेत.