७ मार्च २०२५ नगर : मुलीच्या नावाने इंस्टाग्रामवर खोटे अकाउंट तयार करून तिच्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना मेसेज पाठवून बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. या बद्दल नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात ४ मार्च रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून महेशनगर, बाराबाभळी, भिंगार येथे राहणाऱ्या २७ वर्षीय पीडित मुलीने या बद्दल पोलिसात फिर्याद दिली आहे.
हि घटना १९ फेब्रुवारी २०२५ आधी घडली आहे. संशयित आरोपीने फिर्यादी तरूणीच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून त्यावरून
फिर्यादीचे नातेवाईक व मित्र- मैत्रिणींना मेसेज पाठवून तिची बदनामी केली.हा प्रकार लक्षात येताच पीडित मुलीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

अज्ञात व्यक्ती विरूध्द बीएनएस २०२३ चे कलम ३५६ (२) सह आयटी अॅरक्ट ६६ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करत आहेत. दरम्यान, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सोशल मीडियावर सतर्क राहावे व अशा घटनांची त्वरित पोलिसांकडे नोंद करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे