मुंबई ते गोवा प्रवास होणार सुपरफास्ट ; सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ Railway Station वर मिळणार थांबा!

देशात येत्या काही दिवसांनी होळीचा मोठा सण साजरा होणार आहे आणि याच अनुषंगाने मुंबई ते गोवा दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. खरे तर, मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे सणासुदीच्या काळात तर या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या आणखी वाढत असते.

Published on -

Mumbai Goa New Express Train : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशात येत्या काही दिवसांनी होळीचा मोठा सण साजरा होणार आहे आणि याच अनुषंगाने मुंबई ते गोवा दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. या विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होऊ लागले आहे.

खरे तर, मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे सणासुदीच्या काळात तर या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या आणखी वाढत असते. होळी सणाला देखील या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि याचं अनुषंगाने मध्य रेल्वे मार्गावर नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

ही ट्रेन मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान चालवली जाणार असून आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक कसे आहे ? आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार ? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक ?

मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे मार्गावर मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस अर्थातच एलटीटी दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. गाडी क्रमांक 01104 ही स्पेशल गाडी मडगावहून 16 मार्च 2025 आणि 23 मार्च 2025 रोजी दुपारी साडेचार वाजता रवाना होणार आहे.

तसेच, परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01103 ही स्पेशल गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस अर्थात एलटीटीहून 17 मार्च 2025 आणि 24 मार्च 2025 रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी रवाना होणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?

मध्य रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला दोन्ही दिशेने 19 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या या गाडीला करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग,

कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नक्कीच या विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई ते गोवा हा प्रवास सणासुदीच्या काळात देखील सुपरफास्ट होईल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe