Maharashtra Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. येत्या काही दिवसांनी देशात होळीचा सण साजरा होणार आहे आणि या सणाला देखील रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक होणार आहे आणि याच अनुषंगाने रेल्वे विभागाकडून व्यस्त रेल्वे मार्गांवर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत.
राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी नुकताच रेल्वे विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून दोन नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे विभाग 11 ते 15 मार्च दरम्यान या विशेष गाड्या चालवणार आहे.

गोंदिया ते पटना या मार्गावर एक विशेष एक्सप्रेस ट्रेन आणि गोंदिया ते छपरा या मार्गावर 2 विशेष गाड्या चालवल्या जाणार असून यामुळे विदर्भातून बिहारमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आणि बिहार मधून विदर्भात येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
अशा परिस्थितीत आज आपण 11 ते 15 मार्च दरम्यान धावणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेऊ शकते ? या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार गोंदिया-पटना विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक ?
रेल्वे भागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्र. 08897 ही विशेष रेल्वेगाडी 11 व 12 मार्चला गोंदिया येथून सकाळी 11 वाजता सुटणार आहे. अन ही गाडी दुसर्या दिवशी सकाळी 11 वाजता पटना येथे पोहोचणार आहे. तसेच गाडी क्र. 08898 ही रेल्वेगाडी पटना येथून 12 मार्चला दुपारी 12.30 वाजता सुटणार अन दुसर्या दिवशी गोंदिया येथे दुपारी 2.30 वाजता पोहोचणार आहे.
कसं असणार गोंदिया छपरा विशेष ट्रेनचे वेळापत्रक
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, गाडी क्र. 08895 ही गाडी 11 मार्च रोजी गोंदिया येथून सायंकाळी 5 वाजता सुटणार आहे अन दुसर्या दिवशी छपराला सायंकाळी 5 वाजता पोहोचणार आहे.
तसेच गाडी क्र. 08896 ही गाडी छपरा येथून 12 मार्चला रात्री 10.15 वाजता सुटणार असून, दुसर्या दिवशी गोंदियाला रात्री 11.45 ला पोहोचणार आहे.
गोंदिया-छपरा दुसऱ्या विशेष ट्रेनचे वेळापत्रक कसं असणार
गोंदिया छपरा दुसऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रक बाबत बोलायचं झालं तर गाडी क्र. 08863 ही गाडी 12 मार्च रोजी गोंदिया येथून सायंकाळी 5 वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसर्या दिवशी छपरा येथे सायंकाळी 6 वाजता पोहोचेल.
तसेच गाडी क्र. 08864 ही गाडी छपरा येथून 13 मार्च रोजी रात्री 10.15 वाजता सोडली जाईल आणि ही गाडी दुसर्या दिवशी गोंदियाला रात्री 11.45 वाजता पोहोचणार आहे.