आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतन वाढणार पण ‘हे’ भत्ते कमी होणार ! काही भत्ते कायमचे बंद होणार, 8th Pay Commission बाबत समोर आली मोठी अपडेट

17 जानेवारी 2025 रोजी आठवा वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली असून येत्या काही दिवसांनी याच्या समितीची स्थापना होणार आहे. खरेतर, वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातच वाढ होणार नाही, तर विविध भत्त्यांचाही आढावा घेतला जाणार आहे. कोणते जुने भत्ते काढून टाकायचे आणि कोणते नवे भत्ते जोडायचे याचा निर्णय हा आयोग घेईल.

Published on -

8th Pay Commission : 8 व्या वेतन आयोगाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. सातवा वेतन आयोगाच्या स्थापनेला दहा वर्षांचा काळ पूर्ण होत आला असल्याने केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाची घोषणा केली आहे. 17 जानेवारी 2025 रोजी आठवा वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली असून येत्या काही दिवसांनी याच्या समितीची स्थापना होणार आहे.

याच्या औपचारिक स्थापनेचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झाल्यानंतर कोणते जुने भत्ते काढून टाकायचे आणि कोणते नवे भत्ते जोडायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्याच्या 7व्या वेतन आयोगात 101 भत्ते काढण्यात आले. म्हणून आता नव्या आठवा वेतन आयोगात नेमकं काय होतं, यावेळीही काही भत्ते कमी केले जाणार का ? असे काही प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांना पडले आहेत. खरेतर, वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातच वाढ होणार नाही, तर विविध भत्त्यांचाही आढावा घेतला जाणार आहे.

कोणते जुने भत्ते काढून टाकायचे आणि कोणते नवे भत्ते जोडायचे याचा निर्णय हा आयोग घेईल. दरम्यान आता आपण नव्या आठवा वेतन आयोगात काय होऊ शकतं आणि सध्याच्या सातवा वेतन आयोगात कोणते भत्ते काढून टाकण्यात आले होते? याबाबतचा संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सातव्या वेतन आयोगात काय घडलं होतं?

एक जानेवारी 2016 पासून लागू झालेल्या 7व्या वेतन आयोगात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 2.57 च्या फिटमेंट फॅक्टरने वाढ करण्यात आली होती. यामुळे किमान वेतन 18,000 रुपये आणि कमाल वेतन 2,25,000 रुपये झाले होते. पण सध्याच्या आयोगाने एकूण 196 भत्त्यांचा आढावा घेतला, त्यापैकी केवळ 95 भत्त्यांना मंजुरी देण्यात आली.

तर, 101 भत्ते एकतर रद्द करण्यात आले किंवा इतर भत्त्यांसह एकत्र केले गेले. सातवा वेतन आयोगात अपघात भत्ता समाविष्ट नव्हता. ऍक्टिन्ग भत्ता रद्द करण्यात आला अन ॲडिशनल पोस्ट अलाऊन्स अंतर्गत समाविष्ट करण्यात आला. यात एअर डिस्पॅच पे, को पायलट अलाऊन्स, कुटुंब नियोजन भत्ता, ओव्हरटाइम भत्ता (ओटी), सायकल भत्ता रद्द करण्यात आला.

क्लोथिंग अलाऊन्स हा ड्रेस भत्त्यामध्ये जोडण्यात आला. विशेष वैज्ञानिक वेतन हा भत्ता सुद्धा रद्द करण्यात आला. संडर्बन अलाऊन्स हा कठीण स्थान भत्ता III मध्ये जोडला गेला अन असे इतर अनेक भत्ते एकतर रद्द करण्यात आले किंवा इतर भत्त्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले.

8व्या वेतन आयोगात काय घडू शकत?

8 व्या वेतन आयोगाची अजून स्थापना झालेली नाही. पण लवकरच याची स्थापना होईल, एप्रिल 2025 पर्यंत वेतन आयोगाच्या स्थापनेला मूर्त रूप मिळेल अन आयोगाची स्थापना अंतिम होण्याची शक्यता आहे. यानंतर सरकार मग वेतन आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांची निवड करणार आहे.

नवीन वेतन आयोगाला विविध भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर अहवाल तयार करण्यासाठी सुमारे एक वर्ष लागणार आहे. महत्वाची बाब अशी की याच्या भागधारकांमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींचाही समावेश असेल. असा अंदाज आहे की 8 व्या वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांचा पगार 3.00 च्या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वाढू शकतो, ज्यामुळे किमान पगार 26,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

मात्र, आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या मान्यतेवरचं अंतिम निर्णय अवलंबून असेल. दरम्यान आयोगाच्या शिफारशी कधी स्वीकारल्या जाणार हे जरी नक्की नसले तरी देखील नवीन आठवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासूनच लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या आठव्या वेतन आयोगात नवीन भत्त्यांना जोडले जाऊ शकते, कर्मचाऱ्यांच्या बदलत्या गरजांनुसार नवीन भत्ते जोडले जाऊ शकतात.

तसेच काही जुने भत्ते रद्द केले जातील. महागाई भत्त्यात वाढ (DA) होऊ शकते. पेन्शनधारकांना दिलासा मिळावा या अनुषंगाने पेन्शनधारकांसाठीही नवीन नियम येऊ शकतात, ज्यामुळे त्यांची पेन्शन वाढू शकते. यामुळे आता नव्या आठवा वेतन आयोगात नेमकं काय होतं, कोणते भत्ते जोडले जातात आणि कोणते भत्ते कमी होतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe