Railway News | वंदे भारत धावली आता हायड्रोजन ट्रेन देखील रुळावर येणार ! ‘या’ मार्गावर सुरू होणार देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन

रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले आहे आणि यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे म्हटले की सर्वप्रथम रेल्वेचे नाव ओठांवर येते. महत्त्वाची बाब अशी की भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट व्हावा सुरक्षित व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

Published on -

Railway News : ब्रिटिश काळात सुरू झालेल्या भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे बदलला आहे. खरे तर भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच मोठी आहे. रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले आहे आणि यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे म्हटले की सर्वप्रथम रेल्वेचे नाव ओठांवर येते.

रेल्वे प्रवासाला पसंती दाखवण्याचे दुसरे मोठे कारण असे की रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असतो आणि यामुळे सर्वसामान्य रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दाखवतात. महत्त्वाची बाब अशी की भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट व्हावा सुरक्षित व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

याचाच एक भाग म्हणून देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीची ही ट्रेन सुरू झाल्यामुळे रेल्वेचा प्रवास हा आणखी वेगवान झाला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे येत्या काही महिन्यांनी बुलेट ट्रेन देखील धावताना दिसणार आहे.

असे असतानाच आता देशाला लवकरच एका नव्या ट्रेनची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. येत्या काही महिन्यांनी भारतात हायड्रोजन ट्रेन सुरू होणार आहे. यामुळे देशाचे रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत होईल असे दिसते.

हायड्रोजन ट्रेन सुरू झाल्यास हा रेल्वेच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड राहणार आहे. दरम्यान देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या मार्गांवर सुरू होणार ? याबाबत नुकतेच एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या मार्गांवर धावणार पहिली हायड्रोजन ट्रेन?

भारतातील पहिले हायड्रोजन ट्रेन लवकर सुरू होणार असल्याची बातमी हाती येत आहे. मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवायचं झाल्यास ही ट्रेन यावर्षीच रुळावर धावताना दिसू शकते. यावर्षी मे पासूनचं जिंद-सोनिपत मार्गावर ही ट्रेन सुरू होणार आहे.

ही ट्रेन 1,200 अश्वशक्ती हायड्रोजन इंजिनसह येईल, ज्यामुळे ती जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन-चलित ट्रेन बनणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हायड्रोजन इंजिनमध्ये सामान्यत: 600 ते 800 अश्वशक्ती असते.

मात्र भारतात जी ट्रेन सुरू होणार आहे ती बाराशे अश्वशक्ती हायड्रोजन इंजिनसह येणार आहे. हाती आलेल्या रिपोर्टनुसार ही ट्रेन ताशी 110 किमीने धावण्याची क्षमता ठेवणार आहे आणि या ट्रेनची प्रवासी क्षमता 2,638 लोकांची राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe