Mumbai Goa Travel : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. तसेच गोव्यातूनही अनेक जण मुंबईत येत असतात. मात्र सध्या स्थितीला मुंबई ते गोवा असा प्रवास फारच किचकट बनलाय. मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
सध्या स्थितीला या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करायचं म्हटलं की रस्ते आणि रेल्वे मार्ग हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. रस्ते मार्गाने मुंबई ते गोवा हा प्रवास दहा ते बारा तासात पूर्ण होतो. दुसरीकडे रेल्वे मार्गाने प्रवास करण्यासाठी जवळपास आठ ते नऊ तास लागतात.

मात्र येत्या काही दिवसांनी मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या सहा तासात पूर्ण होणार आहे. रेल्वे किंवा रस्ते मार्गाने नव्हे तर हा प्रवास समुद्र मार्गाने सहा तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
नक्कीच मुंबई ते गोवा असा समुद्र मार्गाने प्रवास सुरू झाला आणि यामुळे प्रवाशांना फक्त सहा तासात मुंबईहून गोव्याला पोहोचता येणे शक्य झाले तर मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खरे तर मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या दीड दशकांपासून सुरु आहे. मात्र अजूनही या महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. दुसरीकडे रेल्वेने जायचे म्हटले तर रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी होते आणि तिकिटासाठीची वेटिंग लिस्ट सुद्धा मोठी असते.
मात्र आता लवकरच एका खाजगी कंपनीकडून मुंबई ते गोवा दरम्यान रो रो बोट सेवा सुरु केली जाणार आहे. या सेवेमुळे मुंबई ते गोवा दरम्यान चा प्रवास फक्त सहा तासात पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण ही रो रो बोट सेवा कधीपासून सुरू होऊ शकते याबाबत माहिती जाणून घेऊयात.
कशी असणार रो रो बोट सेवा?
मिळालेल्या माहितीनुसार एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून मुंबईतील माजगाव ते गोव्यातील मुरगाव दरम्यान रो रो फेरी चालवली जाणार आहे. सुरुवातीस प्रवासी जहाजांच्या माध्यमातून सुरू केली जाणारी ही रो रो फेरी प्रायोगिक तत्त्वावर सुरु होईल.
आधी प्रायोगीक तत्वातावर 60 प्रवाशांची क्षमता असलेल्या जहाजाच्या माध्यमातून ही रो रो सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. जर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या रो रो सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढे ही सेवा कंटिन्यू होईल.
यामुळे महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या पर्यटनासाठी फायदा होणार अशी आशा जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या मुंबई ते गोवा दरम्यान सुरु होणाऱ्या रो रो फेरीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे मात्र ही सेवा कधीपासून सुरू होणार याबाबत अजून कोणतीच माहिती हाती आलेली नाही.