8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणारा सध्याचा सातवा वेतन आयोग येत्या काही महिन्यांनी दहा वर्षांचा होणार आहे. सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला असून वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो. यानुसार नवीन आठवावेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे.
दरम्यान हीच बाब विचारात घेता केंद्रातील सरकारकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. 17 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतला.

दरम्यान आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिल्यानंतर, आता सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या नजरा त्यांचे पगार आणि पेन्शन किती वाढतील यावर आहेत.
खरे तर कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट फॅक्टर वर आधारित असतो. यामुळे आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर नेमका किती वाढणार यावरच कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गणित ठरणार आहे. दरम्यान आता याच बाबत एक नवे अपडेट हाती येत आहे.
मात्र या नव्या अपडेट मुळे सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार आहे कारण की आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतरही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होणार नाही असा दावा होतांना दिसतोय.
काय आहेत डिटेल्स?
नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टिव्ह मशीनरी (एनसी-जेसीएम) चे सचिव शिव गोपाळ मिश्रा यांनी अलीकडेच असे म्हटले आहे की फिटमेंट फॅक्टर मागील वेळेपेक्षा कमी असू नये. ते कमीतकमी 2.57 किंवा त्याहून अधिक असावे. मागील वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवले, मग यावेळी यापेक्षा कमी कसे असू शकते? असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला.
एनसी-जेसीएमचे सचिव म्हणाले की आम्ही 2.86 फिटमेंट फॅक्टरची मागणी करू. जर सरकार या प्रस्तावावर सहमत झाले तर किमान वेतन 18,000 रुपयांवरून 51,480 रुपयांवर जाईल आणि किमान पेन्शन 9000 रुपयांवरून 36,000 रुपयांपर्यंत वाढेल.
जर 8 व्या वेतन आयोगाने 2.57 च्या फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली तर किमान वेतन 18,000 रुपयांवरून 46,260 रुपयांवरून वाढू शकते, तर किमान पेन्शन 9,000 रुपयांवरून 23,130 रुपयांपर्यंत वाढू शकते. मात्र, माजी वित्त सचिव सुभाष गर्ग यांचा असा विश्वास आहे की, 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू होणे जवळपास अशक्य आहे.
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.92 च्या आसपास राहू शकतो. यामुळे सुभाष गर्ग यांनी सांगितल्याप्रमाणे जर फिटमेंट फॅक्टर 1.92 च्या आसपास राहिला तर कर्मचाऱ्यांचा पगार हा दुपटीने वाढणार नाही. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा होणार आहे.
तथापि याबाबतचा निर्णय हा आठवा वेतन आयोगाच्या समितीच्या शिफारशी नंतर केंद्रातील सरकारकडून घेतला जाणार आहे. यामुळे आता आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर काय राहणार आणि कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.