महाराष्ट्राला मिळणार 12वी Vande Bharat ; 10 तासांचा प्रवास फक्त 7 तासात ! मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस, पण….

अजूनही राज्यातील असे काही भाग आहेत जे वंदे भारत एक्सप्रेसपासून दूर राहिलेत. कोल्हापूर देखील अजून पर्यंत वंदे भारत एक्सप्रेस पासून लांब आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधींकडून आणि प्रवासी संघटनांकडून ही गाडी सुरू करण्यासाठी जोरदार मागणी उपस्थित केली जात आहे. परंतु कोल्हापूर-मुंबई वंदे भारत सुरू करण्यासाठी लोणावळा घाटात अडचण असल्याचे कारण मध्य रेल्वेकडून पुढे केले जात आहे.

Published on -

Mumbai Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती येत आहे. महाराष्ट्राला आणखी एका वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असे दिसते. खरेतर, सध्या महाराष्ट्रात 12 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. मुुंबई-गांधीनगर, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-जालना, मुंबई-मडगाव, मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, नागपूर-बिलासपूर, नागपूर-इंदोर, नागपूर-सिकंदराबाद, पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी या ‘वंदे भारत’ राज्यात धावत आहेत, महत्त्वाचे म्हणजे या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय.

मात्र, अजूनही राज्यातील असे काही भाग आहेत जे वंदे भारत एक्सप्रेसपासून दूर राहिलेत. कोल्हापूर देखील अजून पर्यंत वंदे भारत एक्सप्रेस पासून लांब आहे. खरे तर, मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. यासाठी रेल्वे बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा सुद्धा सुरू आहे. कोल्हापूरचे खासदार देखील यासाठी आग्रही आहेत.

खासदारांकडून आणि प्रवासी संघटनांकडून मुंबई कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुरू व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र मध्य रेल्वेच्या आडमुठेपणामुळे मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत नसल्याची खंत प्रवासी संघटनांकडून बोलून दाखवली जात आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधींकडून आणि प्रवासी संघटनांकडून ही गाडी सुरू करण्यासाठी जोरदार मागणी उपस्थित केली जात आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यासाठी सातत्याने संबंधित यंत्रणाकडे पाठपुरावा करत आहेत.

प्रवासी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुरू करावी अशी मागणी सातत्याने उपस्थित होत आहे पण मध्य रेल्वेकडून वारंवार काही ना काही कारणे देत, हा प्रस्ताव रखडवला जातोय. राजधानी मुंबईत झालेल्या मध्य रेल्वेच्या सल्लागार सदस्यांच्या बैठकीतदेखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

परंतु कोल्हापूर-मुंबई वंदे भारत सुरू करण्यासाठी लोणावळा घाटात अडचण असल्याचे कारण मध्य रेल्वेकडून पुढे केले जात आहे. पण ही गाडी सुरू करण्यासाठी घाट सेक्शन अडचण ठरतच नाही कारण की मुंबई – सोलापूर, मुंबई-जालना, मुंबई-शिर्डी या सर्व वंदे भारत याच घाटातून धावत आहेत.

अर्थातच कोल्हापूर-मुंबई वंदे भारतसाठी काहीच अडचण नाही. परंतु मध्य रेल्वेच्या काही अधिकार्‍यांच्या आडमुठेपणा ही गाडी सुरू होण्याच्या आड येत असल्याचा आरोप प्रवासी संघटना करत आहे. खरे तर सध्या मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास करायचं झाल्यास दहा तासांचा वेळ लागतोय मात्र वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी सहा ते सात तासापर्यंत खाली येणार आहे.

अर्थातच प्रवाशांचे तीन ते चार तास वाचणार आहेत. महत्त्वाची बाब अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कोल्हापूरला वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असे आश्वासन दिलेले आहे. यामुळे या मार्गावर वंदे भारत कधी धावणार असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत. मात्र मीडिया रिपोर्ट मध्ये येत्या काही महिन्यांनी याबाबतचा सकारात्मक निर्णय होऊ शकतो असा दावा होतोय.

स्वतः पंतप्रधानांनी कोल्हापूरकरांना आश्वासन दिलेले असल्याने या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावण्याची शक्यता अधिक असल्याचे मत व्यक्त होत आहे. सध्या पुणे ते कोल्हापूर दरम्यान जी गाडी सुरू आहे तीच गाडी मुंबई पर्यंत नेली जाऊ शकते असे सुद्धा बोलले जाऊ लागले आहे. यामुळे आता मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत ट्रेन कधी धावणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe