दुबई मधून स्वस्तात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा हि बातमी वाचाच…

Updated on -

कन्नड अभिनेत्री रान्या रावला दुबईहून भारतात मोठ्या प्रमाणात सोने आणताना अटक करण्यात आली आहे. ती एमिरेट्सच्या विमानाने केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली असताना डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) अधिकाऱ्यांनी तिच्या हालचालींवर संशय घेतला.

तपासानंतर 12.56 कोटी रुपये किमतीचे 14.8 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मते, सोन्याच्या तस्करीसाठी तिने कपड्यांमध्ये सोने लपवले होते. गेल्या काही महिन्यांत दुबईहून मोठ्या प्रमाणात सोने आणण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हा प्रकार त्याचाच एक भाग आहे.

दुबईतून भारतात मोठ्या प्रमाणात सोने का आणले जाते?

दुबई हा सोन्याच्या व्यापाराचा मोठा केंद्रबिंदू आहे आणि तेथील दर भारताच्या तुलनेत कायमच कमी असतात. यामागे मुख्यतः कर संरचना आणि उत्पादन खर्चातील मोठा फरक जबाबदार आहे. दुबईत सराफा आणि दागिन्यांवर कोणताही अतिरिक्त कर लागत नाही, तर भारतात 3% GST आणि आयात शुल्क आकारले जाते. त्यामुळे दुबईमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती 5% ते 7% पर्यंत स्वस्त असतात.

भारताच्या सोन्याच्या आयात धोरणानुसार नियम काय आहेत?

भारत सरकारने दुबईहून सोन्याची आयात करण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत.

  • ड्युटी-फ्री मर्यादा:
    • पुरुष प्रवासी 20 ग्रॅम (₹50,000 मूल्यपर्यंत) सोने कस्टम ड्युटीशिवाय आणू शकतात.
    • महिला प्रवासी 40 ग्रॅम (₹1,00,000 मूल्यपर्यंत) सोने बिनाशुल्क आणू शकतात.
    • 15 वर्षांखालील मुलांना 40 ग्रॅम पर्यंतचे सोने आयात करण्याची परवानगी आहे.
  • ड्युटी भरून आणण्याची मर्यादा:
    • दुबईत 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ राहून परतणाऱ्या प्रवाशांना 1 किलोपर्यंत सोने आयात करण्यास परवानगी आहे, परंतु यासाठी 3% ते 10% पर्यंत कस्टम ड्युटी भरावी लागते.
    • प्रवाशांनी सोन्याचे अधिकृत बिल सादर करणे अनिवार्य आहे.

दुबई आणि भारतातील सोन्याच्या किमतींतील तफावत

६ मार्च २०२५ रोजी दुबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ३२७ दिरहम प्रति ग्रॅम, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ३४९.५० दिरहम प्रति ग्रॅम होती. भारतीय चलनात हा दर 7,749 रुपये प्रति ग्रॅम होता. त्याच दिवशी दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ८,१२० रुपये प्रति ग्रॅम होता. म्हणजेच दुबई आणि भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये 371 रुपयांचा फरक होता, तर एका तोळ्यावर ₹3,710 ची बचत होऊ शकते.

तस्करी रोखण्यासाठी अधिक सतर्कता

दुबईत सोन्याच्या कमी किमती आणि कर सवलतीमुळे मोठ्या प्रमाणात आयात केली जाते, परंतु भारत सरकारने यावर कडक आयात शुल्क आणि मर्यादा लागू केल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने DRI आणि सीमाशुल्क विभागाकडून अधिक तपासणी आणि कडक कारवाई केली जात आहे. रान्या रावच्या अटकेनंतर या प्रकारांवर अजून कठोर पावले उचलली जातील, अशी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe