Lucky Zodiac Sign : आज तारीख 11 मार्च वार मंगळवार. मंगळवार हा महाबली हनुमानचा वार असं म्हणतात. दुसरीकडे आज मंगळ चंद्रापासून बाराव्या घरात बसून द्विद्वादश योग बनवित आहे. तसेच आज चंद्र कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे. अर्थातच चंद्र ग्रहाचे आज कर्क राशीमध्ये आगमन होणार आहे. म्हणून ज्योतिष शास्त्रात आजचा दिवस विशेष खास असल्याचे बोलले जात आहे. आज पासून अनेक राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होणार आहे.
आज 11 मार्चपासून राशीचक्रातील पाच राशीच्या लोकांचा संकटाचा काळ संपणार आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग तयार होत आहेत आणि याच शुभ योगाच्या प्रभावाखाली काही राशीच्या लोकांचे आयुष्य आता बदलणार आहे. दरम्यान आता आपण राशीचक्रातील कोणत्या राशीच्या लोकांचा संकटाचा काळ संपणार आहे, कोणत्या लोकांना या शुभ योगाचा फायदा होईल? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

या 5 राशीच्या लोकांचा संकटाचा काळ आता संपणार
मिथुन : आजचा दिवस मिथुन राशीच्या जातकांसाठी फारच शुभ ठरणार आहे. या लोकांचे गेल्या काही दिवसांपासून थांबलेले काम आता पूर्ण होणार आहे. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस विशेष शुभ असेल. हे लोक आपल्या सहकाऱ्यांशी समन्वय राखण्यास सक्षम असतील आणि त्यांच्याकडून त्यांना अपेक्षित समर्थन देखील मिळवतील. हे लोक काम करतांना सुद्धा आपल्या मित्रांसह मजेचे क्षण घालवतील. या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोकांसाठी देखील हा काळ फायद्याचा राहणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मकर राशी : या लोकांचा संकटाचा काळ आता संपणार आहे. कठीण काम देखील हे लोक अगदी सहजतेने आणि धैर्याने पूर्ण करतील. आज हे लोक आपले काम वेळेत पूर्ण करतील आणि उर्वरित वेळ आपल्या मित्रांसमवेत घालवतील. नोकरदार वर्गांसाठी प्रमोशनची भेट सुद्धा मिळू शकते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस फार खास आहे. कुटुंबात या लोकांचे संबंध आणखी चांगले होतील. भावंडांसोबत या लोकांचे संबंध चांगले होतील आणि त्यांचे पूर्ण समर्थन या लोकांना राहणार आहे. आर्थिक दृष्ट्या देखील आजचा दिवस या लोकांसाठी फायद्याचा राहणार आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांचा संकटाचा काळ आता इतिहासात जमा होईल आणि अच्छे दिन सुरू होतील असे संकेत मिळत आहेत. आजचा दिवस या राशीच्या जातकांसाठी फारच खास ठरणार आहे मात्र या दिवशी या लोकांनी आळस त्यागला पाहिजे. आळस सोडून जर तुम्ही काम सुरू ठेवले तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. तुम्ही जिथे हात लावाल ती गोष्ट मिळवण्याची तुमच्यात क्षमता आहे. यामुळे तुम्ही आळस सोडून प्रामाणिक कष्ट करणे आवश्यक आहे. तुमच्या मनातील काही इच्छा आज पूर्ण होतील असे दिसते. आजचा दिवस हा असा दिवस राहणार आहे जिथे तुमचे मित्र आणि शत्रू देखील तोंडात बोटं घालतील. तुमचा प्रभाव आज सर्वात जास्त दिसेल. नोकरीच्या ठिकाणी देखील तुमचा प्रभाव कायम राहणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायद्याचा राहणार आहे. सरकारी कामे सुद्धा आता पूर्ण होताना दिसतील.
तुळा : या राशीच्या लोकांचा वाईट काळ देखील आता इतिहासात जमा होणार आहे. आज या लोकांना अशा ठिकाणातून लाभ मिळणार आहे जेथून लाभ मिळण्याची यांना आशा सुद्धा नाही. ज्या लोकांचे पैसे अडकलेले असतील त्या लोकांचे पैसे आता परत मिळतील. उसनवारीने दिलेले पैसे परत मिळतील आणि यामुळे यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा आज चांगली दिसेल. नोकरी करणाऱ्या लोकांना अशी काही जबाबदारी मिळणार आहे ज्यामुळे यांचे महत्त्व आणखी वाढेल. पगारवाढीसारखी मोठी भेट सुद्धा मिळू शकते. आज या लोकांचे उत्पन्न वाढणार आहे शिवाय प्रमोशन सुद्धा मिळू शकते.
मेष : नोकरी व्यवसाय आणि शिक्षण अशा सर्वच क्षेत्रासाठी आजचा हा दिवस फायद्याचा राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन तसेच पगार वाढीसारखी भेट मिळू शकते. व्यवसायातून चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. विद्यार्थी आपली प्रतिभा दाखवून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकतात. या लोकांच्या मनातील काही इच्छा आता पूर्ण होतील. आज हे लोक त्यांना आवडेल त्या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी सुद्धा जाऊ शकतात. परिवारात आनंदाचे वातावरण राहणार आहे. जिथे काम करतात तेथील वरिष्ठ या लोकांवर आज विशेष प्रसन्न राहतील.