पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल, 6 लाखाच्या गुंतवणुकीतुन किती रिटर्न मिळणार ?

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेलाचं पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखतात. कमी जोखमीसह अधिक व्याजदर आणि सरकारची हमी असल्यामुळे अनेक गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस एफडीला प्राधान्य देतात. सध्या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेत 1 ते 5 वर्षांच्या मुदतीसाठी 6.90 % ते 7.50% पर्यंत व्याजदर देते.

Published on -

Post Office FD Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. खरे तर सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार बँकांच्या एफडी योजनांना प्राधान्य दाखवत असतात. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना देखील अलीकडे जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

दरम्यान जर तुम्ही ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण पोस्ट ऑफिस च्या टाईम डिपॉझिट योजनेची माहिती पाहणार आहोत.

सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत पोस्ट ऑफिसच्या फिक्स्ड डिपॉझिट योजनेची गणना केली जाते. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेलाचं पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखतात.

कमी जोखमीसह अधिक व्याजदर आणि सरकारची हमी असल्यामुळे अनेक गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस एफडीला प्राधान्य देतात. विशेष म्हणजे, यात 6 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास काही वर्षांतच मोठा परतावा मिळू शकतो.

पोस्ट ऑफिसच्या एफडीवर भारत सरकारची हमी असल्यामुळे गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. सध्या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेत 1 ते 5 वर्षांच्या मुदतीसाठी 6.90 % ते 7.50% पर्यंत व्याजदर देते. पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेतील गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळते.

पाच वर्षांच्या एफडी योजनेत सहा लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

जर कोणी 5 वर्षांसाठी 6 लाख रुपये एफडीमध्ये गुंतवले, आणि व्याजदर 7.5% असेल, तर कालावधी संपल्यानंतर त्याला 8.7 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळेल. म्हणजेच जवळपास 2.7 लाख रुपयांचा अतिरिक्त परतावा मिळू शकतो.

नक्कीच ज्यांना सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक हवी आहे त्यांच्यासाठी पोस्टाचा हा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. वृद्ध आणि निवृत्त व्यक्तींसाठी हा उत्तम पर्याय आहे, कारण त्यांना स्थिर उत्पन्न मिळते.

कर बचतीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठीही ही योजना उपयुक्त ठरू शकते. नक्कीच बँकांच्या एफडी योजनांसारखीचं पोस्टाची एफडी योजना देखील ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe