पुण्याला मिळणार 42 किलोमीटर लांबीचा आणखी एक नवा Metro मार्ग, कसा असणार रूट, पुण्यातील कोणता भाग मेट्रोने जोडला जाणार ? पहा….

सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. तसेच काही मेट्रो मार्गांची कामे सुरू आहेत. तर काही मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आली असून लवकरच यादेखील मेट्रो मार्गांची कामे सुरू होणार आहेत. दरम्यान, पुण्यालगत असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दापोडी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोमार्गानंतर आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे.

Published on -

Pune Metro News : पुण्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्याला आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. तसेच काही मेट्रो मार्गांची कामे सुरू आहेत. तर काही मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आली असून लवकरच यादेखील मेट्रो मार्गांची कामे सुरू होणार आहेत. सध्या स्थितीला मात्र पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.

दरम्यान, पुण्यालगत असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दापोडी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोमार्गानंतर आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. निगडी ते चाकण या मार्गांवर मेट्रो धावताना दिसणार आहे. या मार्गाचा सध्या डीपीआर तयार केला जातोय.

महापालिकेच्या सूचनेनुसार महामेट्रो कडून या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच याचा डीपीआर तयार होईल आणि या डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर याचे काम देखील सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण हा मेट्रो मार्ग प्रकल्प नेमका कसा राहील याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा राहणार नवा मेट्रो मार्ग ?

निगडी ते चाकण दरम्यान जवळपास 42 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग विकसित होणार आहे. मेट्रो मार्गाची सुरुवात ही निगडी मधील भक्ती शक्ती चौकापासून होणार असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. हा मेट्रो मार्ग प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा पिंपरी चिंचवड या शहरातील तब्बल 70 ते 80 टक्के भाग मेट्रो सोबत कनेक्ट होणार आहे.

म्हणजे जवळपास संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मेट्रोचा लाभ मिळणार आहे. या मार्गाद्वारे शहराचा दक्षिण भाग तसेच, भोसरीकडील भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. वाकड आणि पिंपळे सौदागर हा उच्चभ्रू आणि आयटीचा परिसर मेट्रोशी कनेक्ट होणार आहे.

दरम्यान या मार्गाचा आराखडा येत्या चार ते पाच महिन्यात पूर्ण होईल असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जातोय. याचा आराखडा म्हणजे डीपीआर तयार झाला की हा डीपीआर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर होईल.

महापालिकेने याला मंजुरी दिली की मग हा डीपीआर राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर या प्रकल्पाला केंद्रातील सरकारकडे पाठवला जाईल केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली की मग खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे काम सुरू होईल आणि प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर मग एका विशिष्ट टाईम पिरेडमध्ये हा प्रकल्प मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.

पण हा 40 किलोमीटरहुन अधिक लांबीचा मेट्रो मार्ग प्रकल्प सुरू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांशी जनतेला मेट्रोचा लाभ मिळणार आहे. या मार्गाचा रूट नेमका कसा राहणार ? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित होतोय.

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक स्‍थानक, रावेत, मुकाई चौक, पुणे- मुंबई – बेंगळुरू महामार्ग, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण असा राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe