अकोलेच्या नऊ गावांत पंतप्रधान कृषी सिंचन योजना जोरात तब्बल १६३ शेततळी पूर्ण; आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही केले कौतुक

Published on -

अहिल्यानगर : पंतप्रधान कृषी सिंचन योजना याद्वारे पाणलोट विकास घटक प्रकल्पातून अकोले तालुक्यातील तालुक्यातील नऊ गावांत जलसंधारण उपक्रम राबवले जात आहेत. मागील दोन वर्षांत तालुक्यातील नऊ गावांमध्ये १६३ शेततळी पूर्ण झाली आहेत. पुढील कालावधीत आणखी काही जलसंधारणाची कामे पूर्ण करून स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक उन्नतीसाठी नक्कीच लाभ होईल असा विश्वास आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केला.

पाचनई येथे पाणलोट यात्रेचा प्रारंभ करताना डॉ. लहामटे यांनीही या प्रकल्पा अंतर्गत सुरू असलेल्या कामाबद्दल अधिकारी-कर्मचारी यांचे कौतुक केले. यावेळी पर्यटन तज्ज्ञ डॉ. विशाल लाहोटी, कृषि विभागाचे प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा प्रमुख किरण मांगडे, राजाराम साबळे, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी,

पाणलोट विकास पथक सदस्य सागर देशमुख, मनोहर ढगे, सचिन गायकवाड, सरपंच भास्कर बादड, कृषी सहायक तेजश्री कोरडे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी कपिल बिडगर, गोविंद कुल्लाळ, बाळासाहेब बांबळे, नारायण घुले, बाळनाथ सोनवणे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० या प्रकल्पाअंतर्गत तालुक्यातील कोहणे, विहीर, तळे, शिंदे, कोथळे, वागदरी, लव्हाळी ओतूर, लव्हाळी कोतुळ, पाचनई या गावांत मोठ्या प्रमाणात झालेली विकासकामे झाली आहेत. यातील शेततळी शेतकऱ्यांना निश्चितच वरदान ठरणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe