पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पुण्यातील दुसऱ्या रिंग रोडचा मार्ग मोकळा, ‘या’ 13 गावांमधील 115 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव

पीएमआरडीए कडून म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विकसित होणारा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता 83 किलोमीटर लांबीचा राहणार असून यासाठी 14,200 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. दरम्यान आत्तापर्यंत या निधी पैकी 30 टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

Published on -

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात दोन रिंग रोड तयार केले जाणार आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बाह्य रिंग रोड प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून इनर रिंग रोड प्रकल्पाचे म्हणजेच अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.

दरम्यान आता याच अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याच्या कामासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार 13 गावांमध्ये जमिनीचे भूसंपादन केले जाणार असून या संबंधित गावातील 115 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सुपूर्द करण्यात आला आहे.

पीएमआरडीए कडून म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विकसित होणारा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता 83 किलोमीटर लांबीचा राहणार असून यासाठी 14,200 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. दरम्यान आता या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन जलद गतीने करण्यासाठी हालचाली तीव्र झाले असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संयुक्त सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून आता जमिनीचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे एमएसआरडीसीच्या बाह्य रिंग रोड प्रकल्पाप्रमाणेच पीएमआरडीएच्या इनर रिंग रोड प्रकल्पाचे जमिनीचे भूसंपादन देखील जलद गतीने होणार आणि या प्रकल्पाच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार असा विश्वास व्यक्त होतोय.

अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी पीएमआरडीएकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला 113 कोटी रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान आत्तापर्यंत या निधी पैकी 30 टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आता आपण पीएमआरडीएच्या रिंग रोड साठी कोणत्या गावातील भूसंपादनाचा प्रस्ताव तयार झाला आहे, हा रिंग रोड प्रकल्प नेमका कसा राहील? याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

कसा असणार पीएमआरडीएचा रिंग रोड प्रकल्प

आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे जिल्ह्यातील खेड, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील 44 गावांमधून जवळपास 744 हेक्टर जमीन या रिंगरोडसाठी आवश्यक राहणार आहे. हा अंतर्गत रिंग रोड पुणे-सातारा रस्त्याला नगर रस्त्याशी जोडणार असून यामुळे वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे.

या रिंग रोड प्रकल्प अंतर्गत 42 जोड रस्ते, 17 पूल आणि 10 बोगदे विकसित केले जाणार आहेत आणि यामुळे पुणे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला मजबुती प्रदान होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मेट्रो मार्गिकेसाठी 5 मीटर रुंदीची जागाही आरक्षित ठेवली जाणार आहे. या रिंग रोडचा पहिला टप्पा सोलू ते वडगाव शिंदे असा आहे.

सोलू गावातील रिंग रोड राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बाह्यवळण रिंग रोडला सुद्धा जोडला जाणार आहे. तसेच नगर रस्त्यावरील आळंदी ते वाघोली या 6.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी जमीन संपादित करण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे. या रिंग रोडचा 5.7 किलोमीटर लांबीचा भाग पुणे महापालिकेच्या हद्दीत येत आहे जो की लोहगावमधून प्रस्तावित करण्यात आला आहे.

म्हणजे या भागातील रोड पुणे महापालिकेकडून विकसित केला जाणार असून, तो पीएमआरडीएला हस्तांतरित करण्यात येणार अशी माहिती देण्यात आली आहे. हा रोड 65 मीटर रुंदीचा आहे, जो की पुणे ते लोहगावमार्गे पिंपरी-चिंचवडला जोडला जाईल. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थातच सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर पूर्ण केला जाणार आहे.

या गावातील भूसंपादनाचा प्रस्ताव तयार

या रस्त्यासाठी वडाची वाडी, भिलारेवाडी, पिसोळी, येवलेवाडी, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, निगरुडी, कदमवाकवस्ती, सोलू आणि वडगाव शिंदे या गावातील भूसंपादनाचा प्रस्ताव तयार झाला आहे. शिवाय, हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe