Mahindra XEV 9e Price : भारतीय कार मार्केटमध्ये अलीकडे इलेक्ट्रिक एसयूव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे देशातील अनेक दिग्गज कंपन्या इलेक्ट्रिक एसयूव्ही निर्मितीला चालना देताना दिसत आहेत. टाटा महिंद्रा यांसारख्या नामांकित कंपन्यांकडून नवनवीन एसयुव्ही लॉन्च केल्या जात आहेत.
महिंद्राने देखील नुकतीच XEV 9e ही इलेक्ट्रिक SUV लाँच केली आहे. महिंद्रा मोटर्सनेही या सेगमेंटमध्ये आपला ठसा उमटवत Mahindra XEV 9e ही प्रगत तंत्रज्ञानाने सजलेली इलेक्ट्रिक SUV सादर केली आहे.

केवळ ₹21.2 लाख (एक्स-शोरूम) या सुरवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्या या SUV ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल पण एकदम एवढी मोठी रक्कम भरता येत नसेल, तर महिंद्रा तुमच्यासाठी फायनान्स पर्याय उपलब्ध करून देत आहे.
ही गाडी तुम्हाला 5 लाख डाउन पेमेंट केल्यास अन 5 वर्षासाठी 9.8 % व्याजदरात लोन उपलब्ध झाल्यास 28 हजार 978 रुपयांचा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे. म्हणजे अवघ्या ₹5 लाखांच्या डाउन पेमेंटवर तुम्ही ही इलेक्ट्रिक SUV खरेदी करू शकता आणि उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये भरू शकता.
महिंद्रा XEV 9e चे फिचर्स कसे आहेत?
ही इलेक्ट्रिक SUV केवळ डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत नव्हे, तर परफॉर्मन्समध्येही उत्कृष्ट आहे. तिच्या महत्त्वाच्या फीचर्सबाबत बोलायचं झालं तर यात तुम्हाला 59 kWh आणि 79 kWh चा बॅटरी पर्याय मिळतो. ही गाडी पूर्ण चार्जवर 656 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.
यात स्मार्ट आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे. यात अॅडव्हान्स कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. यात पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर आहे जे की उच्च कार्यक्षमतेसह वेगवान आणि स्थिर ड्रायव्हिंग अनुभव देते.
यामुळे ज्यांना पर्यावरणपूरक, इंधन खर्चाची बचत, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान हे सर्व एका गाडीत हवे असल्यास Mahindra XEV 9e हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
विशेषतः फायनान्स योजनेमुळे ज्या ग्राहकांना एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणे शक्य नाही, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय राहणार आहे. नक्कीच तुम्हालाही आगामी काळात इलेक्ट्रिक गाडी घ्यायची असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे.