‘ह्या’ पालिकेत महिलेचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- आम आदमी पार्टीच्या वतीने पाथर्डी पालिका कार्यालयावर डफडे व पोतराज मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.

वेगवेगळ्या मागण्या यावेळी आंदोलकर्त्यानी केल्या. परंतु या आंदोलनाच्या वेळी माया जाधव या महिलेने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला.

यावेळी संतप्त आंदोलंकर्त्यानी पालिका ठेकेदार चालवतात, पदाधिकारी व अधिकारी शनिवार, रविवार येऊन टक्केवारीचा हिशोब करतात, अशी टीका केली.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षापासून सुमारे 300 लाभार्थ्यांचे अनुदानाचे हफ्ते प्रलंबित आहेत. अनेकांनी राहती घरे पाडून ठेवली, काहींचे बांधकाम अर्धवट आहे तर काहींनी व्याजाने पैसे काढून बांधकाम सुरू केले.

अनुदानासाठी अनेकवेळा आंदोलने, मोर्चे काढणत आले. पालिकेच्या अधिकारी व पदाधिकार्‍यांनी फक्त आश्वासने दिली, प्रत्येक्षात काही नाही.

अतिवृष्टीमुळे लोकांना राहण्यासाठी अन्यत्र आश्रय घ्यावा लागला, गोरगरीब वर्गातील लोकांचा आज संताप उफाळून येऊन आंदोलकर्त्यानी तीव्र आंदोलन केले.

यावेळी सुनील पाखरे म्हणाले, कमीशन खाऊन तुमच्या ढेर्‍या व गाल वाढले. वैयक्तिक जीवनाबद्दल बोलणे टाळले. तरी तुम्ही, तुमचे दलाल व ठेकेदार काय उद्योग करता याची सर्व कल्पना आहे.

पालिकेत चरताना सर्वसामान्य जनतेचा विचार करा, ठेकेदारांचे बोट धरत चालू असेलल्या दलालांना पेव्हींग ब्लॉक, रस्ते यातच रस आहे. ज्या झोपडीतून तुमचा कारभार चालतो, तेथे पुढील आंदोलन होईल.

जनतेची कामे होत नसतील तर फड काढा. आमदारांना निव्वळ डोळे झाकून गप्प बसण्यामागचे गुपीत लोकांपुढे उघडे करण्याची वेळ आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe