Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रात आणि देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. कारण म्हणजे रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे आणि रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडेल असा असतो. यामुळे अनेकजण रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दाखवतात. मात्र असे असले तरी अजूनही काही शहरादरम्यान थेट रेल्वे धावत नाहीत. अजूनही काही भाग रेल्वेच्या नकाशा वर आलेले नाहीत.
मात्र ज्या ठिकाणी अजून रेल्वे सुरू झालेले नाही तिथेही रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वेकडून आणि शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याला आणखी 2 नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फाईल बंद असणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव दरम्यानच्या रेल्वे मार्गाला आणि धाराशिव-बीड-छत्रपती संभाजी नगर या दोन रेल्वे मार्ग प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला असून भविष्यात या शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे.
खरे तर गेल्या अनेक वर्षांपासून हे दोन्ही प्रोजेक्ट फक्त कागदावरच दिसतोय परंतु प्रत्यक्षात याबाबत कोणत्याच हालचाली होत नाहीयेत असा ओरड केला जात होता. दरम्यान या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर कार आता स्थानिक लोकप्रतिनिधींचा आणि येथील जनतेचा पाठपुरावा यशस्वी झाला आहे, आता छत्रपती संभाजी नगर ते चाळीसगाव आणि धाराशिव-बीड-छत्रपती संभाजी नगर दरम्यानच्या रेल्वे मार्गाला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असणाऱ्या छत्रपती संभाजी नगर ते चाळीसगाव 93 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेसाठी रेल्वे मंत्रालयाने 2 कोटी 32 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्यामुळे आता या रेल्वे मार्गाचे अंतिम सर्वेक्षण पूर्ण होणार असे चित्र दिसत आहे. या सोबतच धाराशिव-बीड- छत्रपती संभाजीनगर या 250 किमीच्या रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी नगर ते चाळीसगाव रेल्वे मार्गाचा फायदा काय होणार ?
खरेतर सध्या दिल्ली आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेंना आजघडीला मनमाडहून जावे लागत आहे. या रेल्वे मनमाडहून चाळीसगाव आणि जळगावमार्गे उत्तर भारताकडे जातात. यामुळे सध्या स्थितीला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरहून उत्तर महाराष्ट्रातील चाळीसगावला रेल्वेने जाण्यासाठी तीन तासांपेक्षा अधिकचा वेळ लागत आहे.
सध्याचा संभाजी नगर ते चाळीसगाव हा रेल्वे मार्ग जवळपास 160 किलोमीटर लांबीचा आहे. मात्र नवा छत्रपती संभाजीनगर – चाळीसगाव रेल्वे मार्ग हा फक्त 93 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. कारण म्हणजे हा नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला रेल्वे मार्ग झाल्यानंतर, मनमाड न जाता थेट रेल्वे गाड्या चाळीसगावला पोहोचतील. या प्रकल्पामुळे या भागातील प्रवाशांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय टळणार आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे दिल्लीचे अंतर जवळपास 250 किलोमीटरने कमी होणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग पण पूर्ण होणार
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर हा रेल्वेमार्ग सुद्धा गेल्या काही वर्षांपासून फक्त कागदावरच राहिला होता. मात्र आता हा प्रकल्प देखील मार्गी लागणार आहे. या नवीन रेल्वेमार्गाच्या मंजुरीच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले आहेत, असे रेल्वेमंत्र्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी सांगितले.
त्यानंतर आता या रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत एक नवीन अपडेट हाती येत आहे. आता या रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी 6 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे हा देखील रेल्वे मार्ग प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे आणि यामुळे धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर या दरम्यानचा प्रवास देखील भविष्यात वेगवान होणार आहे.