SBI Vs HDFC Home Loan : अलीकडे जमिनीच्या आणि घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे स्वतःचे घर घेणे किंवा जमिनीत, निवासी प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणे फारच अवघड बनले आहे. खरे तर आपल्यापैकी अनेकांचे प्राईम लोकेशन वर घर असावे असे स्वप्न असेल.
मात्र मोक्याच्या ठिकाणी घर घ्यायचे म्हटले की लाखो रुपयांचा खर्च आलाच. आता प्रत्येकालाचं लाखो रुपयांचा खर्च करून घराचे स्वप्न काही पूर्ण करता येत नाही. यामुळे अनेक जण होम लोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात.

दरम्यान जर तुम्हीही होम लोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण एसबीआय आणि एचडीएफसी या देशातील दोन प्रमुख बँकांच्या गृह कर्जाच्या व्याजदराची तुलना करणार आहोत. यातून तुम्हाला कोणत्या बँकेचे गृह कर्ज फायदेशीर आहे याची कल्पना येणार आहे.
एसबीआय बँकेचे गृह कर्जासाठीचे व्याजदर
एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून सध्या ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.25 टक्के व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र बँकेचा हा किमान व्याजदर असून याचा लाभ फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळतो.
800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या लोकांना एसबीआय कडून किमान 8.25% इंटरेस्ट रेट वर होम लोन मिळते. अशा परिस्थितीत जर एखाद्या ग्राहकाला किमान 8.25% इंटरेस्ट रेटवर 30 लाख रुपयांचे होम लोन पंधरा वर्षांसाठी मंजूर झाले तर 29 हजार 104 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच सदर ग्राहकाला 22 लाख 38 हजार 758 रुपये फक्त व्याज स्वरूपात द्यावे लागणार आहे. आरबीआयने एसबीआय ला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेच्या यादीत ठेवले आहे.
एचडीएफसी बँकेचे गृह कर्जासाठीचे व्याजदर कसे आहेत
एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. आरबीआयने या बँकेला सुद्धा देशातील सर्वात सुरक्षित बँकेचा दर्जा सुद्धा दिलेला आहे. ही बँक सध्या स्थितीला आपल्या ग्राहकांना 8.75 टक्के इंटरेस्ट रेटवर गृह कर्ज देत आहे. पण हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे याचा फायदा फक्त चांगला सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांनाच मिळतो.
दरम्यान जर 8.75 टक्के इंटरेस्ट रेट वर 30 लाख रुपयांचे गृह कर्ज पंधरा वर्षांसाठी मंजूर झाले तर 29 हजार 983 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच 23 लाख 97 हजार 23 रुपये फक्त व्याज म्हणून सदर ग्राहकाला बँकेला द्यावे लागणार आहेत.