Snake Viral News : भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे अनेकांचा मृत्यू होतो. अधिकृत आकडेवारीनुसार देशात सर्पदंशामुळे दरवर्षी 56000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळे साप हे नाव जरी ऐकले तरी बऱ्याच जणांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. तुम्ही कधी साप बघितला असेल तर नक्कीच तुमच्याही अंगावर काटा उभा राहिला असेल. खरंतर भारतात सापाच्या विविध जाती आढळतात.
मात्र यातील बहुतांशी जाती या बिनविषारी असतात. भारतात आढळणाऱ्या सापांच्या जाती पैकी फक्त बोटावर मोजण्या इतक्याचं जाती विषारी असल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी देशात सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या फार अधिक आहे आणि म्हणूनच सापांपासून स्वतःचा बचाव किंवा संरक्षण करणे गरजेचे असते.

दरम्यान, काही तज्ञांनी जर तुम्हाला सापांची भीती वाटत असेल, तुमच्या घराजवळ सातत्याने साप दिसत असतील तर तुमच्या घराजवळ काही असे झाड असू शकतात ज्यांच्याकडे साप आकर्षित होत असल्याचे म्हटले आहे. तज्ञ लोक सांगतात की, निसर्गात असे काही झाडे आहेत ते जर घराजवळ असले तर त्यांच्यामुळे साप घराच्या आसपास किंवा घरामध्ये देखील येऊ शकतात. दरम्यान आता आपण कोणती झाडे सापांना आकर्षित करतात? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
ही झाडे सापांना आकर्षित करतात
क्लोव्हर प्लांट- जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे ही छोटीशी वनस्पती सापांना आकर्षित करते. खरे तर या वनस्पतीची उंची फारच कमी असते. त्यामुळे जमिनीच्या अगदी जवळ ती पसरत असल्यामुळे साप या ठिकाणी सहजपणे लपून बसतात व त्या ठिकाणी विश्रांती घेतात. या वनस्पतीच्या खाली थंडावा देखील असतो अन म्हणून साप या ठिकाणी येऊन बसण्याची शक्यता असते. त्यामुळे घराजवळ हे झाड चुकूनही लावू नये.
चंदन- चंदनाच्या झाडाकडे साप आकर्षित होतात असे म्हटले जाते. चंदनाचा सुगंध सापांना आकर्षित करतो. साप आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी चंदनाच्या झाडाभोवती मोठ्या प्रमाणात दिसतात असे म्हटले जाते. तसेच चंदनाचे झाड हे फारच दाट असते आणि अशा दाट झाडांमध्ये आढळू शकतात. यामुळे चंदनाचे झाड जरी सुगंधी असले आणि औषधी असले तरी देखील घराजवळ लावू नये असा सल्ला देण्यात आला आहे.
लिंबूचे झाड – लिंबू चे झाड असेल तर त्याच्या आजूबाजूला देखील सापांचा वावर आढळतो. कारण असे की अनेक छोटे छोटे कीटक उंदीर पक्षी लिंबू खातात आणि या छोट्या छोट्या कीटकांची उंदरांची शिकार करण्यासाठी साप लिंबाच्या झाडाजवळ भटकताना दिसतात. यामुळे लिंबूचे झाड घराच्या जवळ लावू नये लांब लावल्यास काही प्रॉब्लेम नाही. जर समजा हे झाड आधीच तुमच्या घराशेजारी असेल आणि तुम्हाला ते उपटायचे नसेल तर तुम्ही या झाडाजवळ स्वच्छता ठेवायला हवी.
सायप्रस प्लांट किंवा सरूचे झाड – अनेकांना आपल्या घराजवळ शोभेच्या झाडांची लागवड करण्याचा छंद असतो. काहीजण सावलीसाठी देखील झाडांची लागवड करत असतात. सायप्रस प्लांट ही एक शोभेची वनस्पती आहे. यामुळे अनेकांच्या अंगणात किंवा घराच्या जवळ, बागेत हे झाड प्रकर्षाने आढळते. पण या प्लांटची पाने बारीक असतात आणि ते झुडूपा सारखे असते. हे दिसायला सुंदर असते व दाट असल्यामुळे त्या ठिकाणी साप सहजपणे वास्तव्य करू शकतात. यामुळे हे झाड घराच्या जवळ लावू नये असे म्हटले जाते.
चमेली- चंदनाप्रमाणे चमेलीच्या झाडाचा सुगंध देखील फारच छान असतो आणि यामुळे अनेक जण या सुगंधी वनस्पतीचे आपल्या घराच्या शेजारी लागवड करतात. हे झाड दिसायलाही सुंदर दिसतं आणि एक सावली देणारी वनस्पती म्हणून ओळखली जाते. असे म्हणतात की हे झाड घराजवळ असेल तर घरात पॉझिटिव्ह एनर्जी खेळती राहते आणि घरात सुख-समृद्धी राहते. यामुळे अनेकजण या झाडाची लागवड करतात पण या झाडाच्या आजूबाजूला देखीलच सापांचा वावर आढळतो यामुळे शक्यतो हे झाड घराच्या शेजारी लावू नये आणि लावलेले असेल तर त्या झाडाच्या आजूबाजूला चांगली स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी.
देवदाराचे झाड- देवदाराचे झाड हे एक जंगली झाड आहे सहसा हे झाड कोणी आपल्या घराशेजारी लावत नाही. हे प्रामुख्याने जंगलात आढळते पण काही लोक जंगलाच्या शेजारी राहतात आणि अशा घरांच्या शेजारी याचे झाड पाहायला मिळते. पण हे आकाराने मोठे असणारे झाड सावलीसाठी फारच उत्कृष्ट असून याच सावलीमध्ये साप आढळतात. त्यामुळे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला हे झाड असेल तर ते झाड तुम्ही काढून टाकायला हवे किंवा मग अशा झाडाच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवून या झाडाच्या शेजारून जाताना काळजी घेणे आवश्यक आहे.