अहिल्यानगर : माझ्यावर जास्त अवलंबून राहू नका, हे जयंत पाटलांचे विधान म्हणजे शरद पवारांना सूचक इशारा असून त्यांनी आता सतर्क राहिले पाहीजे, असा खोचक टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.

मढी येथील वादाची सर्व माहिती आपण प्रशासनाकडून घेतली असून यामध्ये योग्य मार्ग काढण्याच्या दृष्टीने आमदार महोदयांशी संपर्कात असल्याचे विखे पाटील म्हणाले. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले वक्तव्य विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नाही. त्यांनी केलेल्या सूचनांचा पक्षामध्ये आदरच असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
संगमनेर नगरपालिकेतील बैठकीनंतर झालेल्या गोंधळा संदर्भात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, गोंधळ घालणारे कोण आहेत, हे सर्वाना माहित आहे. त्याचा प्रभाव फारसा होत नाही.