अपहरण, खून आणि गँगस्टर टोळी ! लपका सोमवंशीसह ९ आरोपींना नाशिक कारागृहात हलवले ! खरं कारण काय ?

Published on -

अहिल्यानगरातील सावेडी भागात झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या लपकासह नऊ आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्थानिक सबजेलमध्ये जागा उपलब्ध नसल्याने या आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

वैभव नायकोडी खून प्रकरण

22 फेब्रुवारी रोजी सावेडी येथील वैभव नायकोडी याचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासानंतर पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये अनिकेत ऊर्फ लपका विजय सोमवंशी, सुमित बाळासाहेब थोरात, महेश मारुतराव पाटील, नितीन अशोक नन्नावरे, विशाल दीपक कापरे, विकास अशोक गव्हाणे, करण सुंदर शिंदे, रोहित बापूसाहेब गोसावी आणि स्वप्निल रमांकात पाटील (सर्व रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.

न्यायालयाचा आदेश

बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, स्थानिक सबजेलमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले. परिणामी, या आरोपींना नाशिक कारागृहात हलवण्याचा आदेश देण्यात आला.

दुसऱ्या अपहरण प्रकरणातही गुन्हा दाखल

या आरोपींनी केवळ वैभव नायकोडी याचे अपहरण करून खून केला नाही, तर त्यांनी आणखी एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केली होती. त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपींवर आणखी एका अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe