जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल

Published on -

१४ मार्च २०२५ नगर :आंदोलनाबद्दल जिल्हा प्रशासनाला कोणतीही सूचना न देता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आणि घोषणाबाजी करणाऱ्या निर्भया महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी आणि आंदोलकांवर तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे कर्जदार यांनी निर्भया महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ११ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून धरणे आंदोलन केले.

या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करण्याबद्दल जिल्हा प्रशासनाला कोणतीही सूचना न देता मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड कंपनी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून पोलिसांनी दिलेल्या सूचना धुडकावून लावत आंदोलन केले.

याबद्दल तोफखाना पोलीस ठाण्यात पो. कॉ. गोकुळ वाघ यांच्या फिर्यादीवरुन निर्भया महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी जितेंद्र नरेश भावे (रा. नाशिक) व मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे कर्जदार असीफ आयुब पठाण (रा. भेंडा, ता. नेवासा,) अरुण वैद्य व कैलास राजळे (दोघे रा. शहर टाकळी, ता. शेवगाव) कचरू पठाडे व किशोर आरगडे (दोघे रा. नेवासा) राजेंद्र गवराज हारदे (रा. टाकळीमिया, ता. राहुरी) नवनाथ आढाव (रा. तपोवन रोड, अ.नगर), संगीता तिडके (रा. नेवासा), शितल गोरे (रा. अकोला), रफिक गणी शेख (रा. तिसगाव) यांच्यावर भारतीय न्याय संहिता २२३ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe