महागाई भत्ता (DA) वाढीनंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी गुड न्यूज ! लागू झाला ‘हा’ नवीन भत्ता

Published on -

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या होळी सणाची संपूर्ण देशात धुम आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील होळीची मोठी धूम पाहायला मिळत आहे. उद्या 14 मार्च रोजी संपूर्ण देशभर होळीचा सण साजरा होणार आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र आजच होळीचा सण साजरा होईल आणि उद्या धुलीवंदनाचा म्हणजेच धुळवड साजरी केली जाणार आहे. दरम्यान, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन भत्ता लागू करण्यात आला आहे. दरम्यान, आता आपण राज्य शासनाने नेमका याबाबत काय निर्णय घेतला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय निर्णय झाला ?

राज्यातील सरकारने गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात एक मोठा निर्णय घेतला. 27 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य सरकारने एक जीआर काढला यानुसार राज्यातील अपंग समावेशित शिक्षण योजना ( प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या दिव्यांग विशेष शिक्षकांसाठी सरकारने एक नवीन भत्ता लागू केला आहे. या संबंधित कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ता लागु करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आला असून या निर्णयाचा या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या या जीआर मध्ये असे नमुद करण्यात आले आहे की, समग्र शिक्षा अभियान योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता वाहतूक भत्ता लागू राहणार आहे. यापूर्वी या कर्मचाऱ्यांना हा भत्ता लागू नव्हता मात्र आता हा नवा भत्ता लागू होणार असल्याने त्यांच्या पगारात वाढ होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा शासन निर्णय जारी करताना सरकारकडून यासाठी निधीची सुद्धा उपलब्धता करून देण्यात आली आहे. दरम्यान राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा 06 जिल्हा समन्वयक, 52 विशेष तज्ञ / समावेशित शिक्षक व 158 विशेष शिक्षक असे एकुण 216 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. खरे तर हा निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागच्या दिनांक 20 एप्रिल 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार लागू झाला आहे.

अर्थात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून जारी करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार या संबंधित कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ता लागु करण्यास 27 फेब्रुवारी 2025 रोजी च्या शासन निर्णयाअन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार, आता ऑगस्ट 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीमधील वाहतुक भत्ता अदा करणेकामी एकुण 44,03,700/- रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता सुद्धा देण्यात आली आहे. होळी सणाच्या आधीच शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या निर्णयाचे स्वागत केले जात असून होळी सणाची ही एक मोठी भेट असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News