१४ मार्च २०२५ गणोरे : अकोलेमधील आढळा धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातल्या या रब्बी हंगामात अवघ्या सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रावर पाट पाण्याचे सिंचन केले गेले.जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढली असल्यामुळे विहीर बागायतदार शेतकऱ्यांकडून पाट पाण्याच्या मागणीत मोठी कमतरता निर्माण झाली आहे.
एक हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या धरणाच्या उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील दोन हजार ४२२ हेक्टर तसेच डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील एक हजार ४९२ हेक्टर; असे एकूण तीन हजार ९१४ हेक्टर लाभक्षेत्र आहे.पण या रब्बी हंगामात अवघ्या सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात केले गेले तसेच कालव्यांच्या लाभक्षेत्रात नसलेल्या धरण परिसरातील क्षेत्रासाठी उपसा सिंचन योजना चालू आहेत.

धरणाच्या पाणी साठ्यातून वीज पंपांनी थेट उपसा सिंचन योजनांद्वारे सुमारे ५०० हेक्टर क्षेत्राचे सिंचन रब्बी हंगामात करण्यात आले.गेल्या काही वर्षात सातत्याने भरलेले पाझर तलाव, नदी पात्रातील बंधारे, गावतळी, शेततळी आणि ओढ्यांना सोडलेले धरणाचे अतिरिक्त पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत लक्षवेधी वाढ झाली आहे.म्हणून विहिरीं मधून पुरेसे पाणी मिळत असल्यामुळे ; शेतकऱ्यांकडून कालव्यांच्या आवर्तन काळात पाण्याच्या मागणीत घट झाली आहे.