अहिल्यानगर कर इकडे लक्ष द्या ! शहरात पाणीपुरवठा बंद पाहा संपूर्ण वेळापत्रक!

Published on -

Ahilyanagar City Water : अहिल्यानगर शहरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे, महावितरणच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी शनिवारी (२५ मार्च) पाणी योजनेवरील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित होणार आहे. या भागांमध्ये नियोजित दिवशीच पाणीपुरवठा केला जाणार असल्याने नागरिकांनी पूर्वतयारी करावी.

वीजपुरवठा बंद राहणा

शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुळा धरण विद्युत वाहिनीवरील वीजपुरवठा पूर्णतः बंद राहील. या शटडाऊन दरम्यान महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील आवश्यक दुरुस्तीची कामेही केली जाणार आहेत. त्यामुळे मुळानगर आणि विळद येथून होणारा पाणी उपसा पूर्णपणे थांबणार आहे.

शनिवारी या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद

बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगर, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव आणि नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या भागांमध्ये शनिवारी सकाळी ९ नंतर पाणीपुरवठा होणार नाही. या भागांमध्ये रविवारी (२६ मार्च) पाणीपुरवठा केला जाईल.

रविवारी पाणीपुरवठा खंडित राहणार भाग

सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, खिस्त गल्ली, पंचपौर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर आणि सावेडी या भागांमध्ये रविवारी पाणीपुरवठा बंद राहील. या भागांमध्ये पाणीपुरवठा सोमवारी (२७ मार्च) सुरळीत होईल.

सोमवारी होणार मंगळवारी पाणीपुरवठा

मंगलगेट, रामचंद्र खूंट, झेंडीगेट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळबागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी, गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिल्व्हर हडको, प्रेमदान हडको, टीव्ही सेंटर परिसर, म्युनिसिपल हडको, स्टेशन रोड, आगरकर मळा आणि विनायक नगर या भागांमध्ये सोमवार ऐवजी मंगळवारी (२८ मार्च) पाणी सोडले जाईल.

नागरिकांनी पाणी साठवण्याचे आवाहन

महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन पुरेशा पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठ्याच्या बदललेल्या वेळापत्रकानुसार नागरिकांनी आपल्या दैनंदिन गरजांसाठी नियोजन करावे, अशी सूचना महापालिकेकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe