Maharashtra New Railway Station : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट आणि सुरक्षित व्हावा या अनुषंगाने शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील विविध शहरे रेल्वेने जोडली जात आहेत.
यासाठी नवनवीन रेल्वे मार्ग तयार होत आहेत तसेच नवनवीन रेल्वे स्टेशन देखील विकसित केली जात आहे. अशातच आता ठाणेकरांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. ठाण्यात एक नवं रेल्वे स्टेशन उभे राहणार आहे. यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई जवळील ठाणे येथे एक खास रेल्वे स्टेशन उभं राहणार आहे जे की असं अद्भुत रेल्वे स्टेशन असेल जे की 11 मजली राहणार आहे. हे रेल्वेस्टेशन एक दोन नाही तर तब्बल अकरा मजली राहणार असल्याने या रेल्वेस्थानकाचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
या रेल्वेस्टेशनच्या माध्यमातून प्रवाशांच्या प्रवासाचीच आरामदायक व्यवस्था केली जाणार नाही तर लोकांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या रेल्वे स्टेशनच्या वर मॉल, ऑफिस आणि रिटेल शॉप सुद्धा तयार केले जाणार आहे.
या प्रकल्पामुळे रेल्वेच्या प्रवाशांना मोठी सुविधा निर्माण केली जाणार आहे अन या माध्यमातून सरकारला चांगला महसूल सुद्धा प्राप्त होणार आहे. यामुळे ठाण्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होतोय.
कुठं तयार होणार नवीन स्थानक ?
ठाण्यात तयार होणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल, अशी आशा आहे. ठाण्यात तयार होणारे हे नव रेल्वे स्थानक ठाणे रेल्वे स्टेशनजवळील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 ए जवळील 10 हजार मीटर परिसरामध्ये तयार केला जाणार आहे.
त्याबरोबरच या प्रकल्पासाठी 24 हजार 280 वर्गमीटर जमीन भाडेतत्त्वावर सुद्धा घेतली जाणार आहे. ही जागा 60 वर्षांच्या करारावर भाड्याने घेतली जाईल अशी माहिती समोर आली आहे. एकंदरीत हा प्रकल्प फारच मोठा राहणार आहे अन हा प्रकल्प 30 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आहे.
या रेल्वे स्टेशनला बस आणि मेट्रोची सुद्धा कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास वेगवान होणार आहे. हा प्रकल्प जून 2026 मध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर काही महिन्यांनी हे नव रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.