संगमनेर तालुक्यातील एका गावातील कीर्तनकारांच्या पत्नीच्या फोटोची छेडछाड करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याच्या प्रकरणाशी मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध कीर्तनकार विशाल महाराज खोले यांचा संबंध नाही. याप्रकरणी आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या बातमीत चुकीने त्यांचे नाव छापून आले आहे.
संगमनेर तालुक्यातील एका गावातील पती-पत्नी कीर्तनसेवा करतात. १० मार्च रोजी दुपारी संबंधित कीर्तनकाराच्या मोबाइलवर एक आक्षेपार्ह फोटो अज्ञात व्यक्तीने पाठवला. यानंतर ११ मार्चला हा आक्षेपार्ह फोटो समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत करण्याची धमकी देऊन तो डिलीट करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली.याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या सर्व प्रकरणी प्रसिध्द केलेल्या बातमीमध्ये मुक्ताईनगर येथील प्रसिध्द कीर्तनकार विशाल महाराज खोले यांचे नाव चुकीने प्रसिद्ध झाले.

या प्रकरणात झालेल्या आरोपांबद्दल त्यांचा काही संबंध नाही. संबधित प्रकरणात आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान ‘बातमीमुळे विशाल महाराज खोले व त्यांच्या राज्यभरात असलेल्या वारकरी संप्रदायातील भाविकांना जो मनःस्ताप झाला, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहे.