Ahilyanagar News : साखरपुडा तोंडावर, त्याआधीच कर्ता मुलगा गेला ..! आईवडिलांनी त्याचे अवयदान करत अनेक कुटुंबाना दिली नवसंजीवनी, अहिल्यानगरमधील कहाणी

Published on -

संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. ९ मार्च रोजी साखरपुडा ठरला होता. कुटुंबाने साखरपुड्याची तयारी केली होती. मात्र उद्याच्या संसाराची स्वप्न रंगवाणारा वैभव खरंच एक मोठ अस्वस्थ करणार दुःख देऊन गेला. नियतीने आनंदाऐवजी दुःखाची शिदोरी पाठवली. परंतु त्यांच्या आईवडिलांनी मोठं दुःख उरावर होत तरीही कुटुंबीयांनी युवकाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या आईवडिलांनी घेतलेल्या महान निर्णयामुळे त्याचे दोन नेत्र, मूत्रपिंड, यकृत आणि एक हृदय गरजू रुग्णांना नवसंजीवनी देणार आहे.

समाजात विविध दुःख असणारी व विविध दुःख झेलणारी माणसे आहेत. काही माणसे आपल्या कर्तृत्वाने अजरामर होतात. कितीही दुःखाचा डोंगर स्वतःवर कोसळला असला तरी समाजहिताचाच विचार हे लोक करत असतात.अशा काहीसा प्रकार घडलाय अहिल्यानगरमध्ये. घरातील एकुलता एक, कर्ता मुलगा ब्रेन डेड ने गेला. मोठं दुःख उरावर होत तरीही कुटुंबीयांनी युवकाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अनेक गरजूंना जीवदान मिळणार असून तीन ते चार कुटुंबातील आनंदाचा प्रकाश उगवणार आहे.

अधिक माहिती अशी : वैभव सोपान खैरे असे ब्रेनडेड झालेल्या युवकाचे नाव. त्यांच्या आईवडिलांनी घेतलेल्या महान निर्णयामुळे त्याचे दोन नेत्र, मूत्रपिंड, यकृत आणि एक हृदय गरजू रुग्णांना नवसंजीवनी देणार आहे. गरिबीशी झुंज देणाऱ्या एका शेतकरी, कष्टकरी वडिलांनी वैभवला संघर्षातून स्वतः च्या पायावर उभे केले होते. पुण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये वैभव खैरे कार्यरत होता. शुक्रवार दि. ७ मार्च रोजी वैभवला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर सहकाऱ्यांनी वैभवला रुग्णालयात दाखल केले. तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्यानंतर ब्रेनडेड झाल्याचे निदान झाले. या बाबतची माहिती कुटुंबीयांना समजल्यानंतर मोठा धक्काच बसला.

मेहुणे सचिन अंबेकर, भाऊ हरिचंद्र खैरे, भाऊ कृष्णा दळवी, मामा अनाजी दळवी, मेहुणे दत्तू इल्हे, रूममेट स्वप्नील आणि सर्व कुटुंबीयांनी गरजू रुग्णांसाठी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करून त्याचे अवयव गरजू रुग्णांसाठी नोंद असलेल्या ठिकाणी नेण्याचे निश्चित करण्यात आले.

नियतीने दुःखाची शिदोरी पाठवली

संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. ९ मार्च रोजी साखरपुडा ठरला होता. कुटुंबाने साखरपुड्याची तयारी केली होती. मात्र उद्याच्या संसाराची स्वप्न रंगवाणारा वैभव खरंच एक मोठ अस्वस्थ करणार दुःख देऊन गेला. नियतीने आनंदाऐवजी दुःखाची शिदोरी पाठवली. मात्र शेतकरी, कष्टकरी वडिलांच्या मुलाने मृत्यूनंतरही समाजासाठी अमूल्य देणगी दिली. वडिलांनी केवळ आपल्या मुलाला अमर केले नाही, तर एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe