पुणे अन पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्वाची बातमी, दापोडी ते निगडी नंतर आता ‘या’ भागापर्यंत सुरु होणार मेट्रो !

Published on -

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. शहरात सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांमुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे.

मात्र अजूनही शहरातील एक मोठा भाग मेट्रो पासून वंचित आहेत. दरम्यान आता पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. दापोडी ते निगडी या मेट्रो मार्गानंतर आता शहराला आणखी एका मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे.

कसा असणार मेट्रो मार्ग?

हा नवा मेट्रो मार्ग निगडी ते चाकण पर्यंत राहणार आहे. या मेट्रो मार्गाच्या निर्मितीनंतर निगडी ते चाकण हा प्रवास देखील सुपरफास्ट होणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी डीपीआर म्हणजेच सर्वकष प्रकल्प अहवाल तयार केला जातोय. हा अहवाल महा मेट्रोच्या माध्यमातून तयार होतोय.

या मार्गाबाबत बोलायचं झालं तर हा मेट्रो मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून ते चाकणपर्यंत राहणार आहे. या मेट्रो मार्गाची अंदाजीत लांबी 42 किलोमीटर राहील. या मेट्रोमार्गामुळे पिंपरी चिंचवड मधील बहुतांशी भाग मेट्रो सोबत जोडला जाणार आहे.

हा मेट्रो मार्ग पूर्ण झाला की शहरातील 75 टक्के भाग मेट्रो कनेक्टिव्हिटीने सुसज्ज होणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल.

हा मार्ग शहराचा दक्षिण भाग तसेच, भोसरीकडील भाग मेट्रोने जोडणारा असल्याने तसेच वाकड आणि पिंपळे सौदागर हा उच्चभ्रू आयटीचा परिसर मेट्रोशी कनेक्ट होणार असल्याने या प्रकल्पाचे काम जलद गतीने झाले पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे.

दरम्यान आता याच मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. येत्या चार ते पाच महिन्यात या मेट्रोमार्ग प्रकल्पाचा डीपीआर रेडी होईल असे म्हटले जात असून हा डीपीआर प्रथम महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येणार आहे.

यानंतर मग हा प्रस्ताव राज्य शासनाकडे आणि तेथून पुढे केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. येथून मंजुरी मिळाली की मग प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

या मार्गाचा रूट निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक स्‍थानक, रावेत, मुकाई चौक, पुणे- मुंबई – बेंगळुरू महामार्ग, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण असा हा राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe