पुण्यातील बस प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! सुरू झाली नवीन बस सेवा

पीएमपीएलच्या माध्यमातून एका नव्या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस सेवा पिंपरी चिंचवड शहरातील लोकांसाठी अधिक फायद्याची ठरणार आहे. पिंपरी चिंचवड शहराचा गेल्या काही वर्षांमध्ये मोठा विकास झाला आहे. येथील रावेत परिसर सुद्धा झपाट्याने विकसित होत आहे. यामुळे या मार्गावर बस चालवण्याची मागणी केली जात होती.

Published on -

Pune Bus Service : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पी एम पी एल च्या बसेस सुरु आहेत. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये सुरू असणारे लोकल देतील लाईफ लाईन आहे त्याचप्रमाणे पीएमपीएलच्या बसेस देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील लोकांसाठी लाईफ लाईनचे काम करतात.

या बसेसमुळे शहरातील प्रवासा चांगला वेगवान झाला आहे. दरम्यान शहरातील बस प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पीएमपीएलच्या माध्यमातून एका नव्या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस सेवा पिंपरी चिंचवड शहरातील लोकांसाठी अधिक फायद्याची ठरणार आहे.

दैनंदिन कामानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील रावेत भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पी एम पी एल प्रशासनाकडून दोन नवीन बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहराचा गेल्या काही वर्षांमध्ये मोठा विकास झाला आहे.

येथील रावेत परिसर सुद्धा झपाट्याने विकसित होत आहे. याच्या जवळच आयटी नगरी म्‍हणजे हिंजवडी आहे. म्हणून झपाट्याने विकसित होणार्‍या या परिसरात गृह खरेदीसाठी आयटीयन्‍स पसंती देत आहेत. पण रावेत परिसरातून हिंजवडी ला जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध नाही.

विकसनशील रावेत परिसरातुन हिंजवडी आणि तळवडे भागात कामावर जाणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी देखील हिंजवडी आणि तळवडे भागासाठी रावेत मधून एकही पी एम पी एल ची बस सुरू नाही. यामुळे या मार्गावर बस चालवण्याची मागणी केली जात होती.

दरम्यान आता ही मागणी पूर्ण करण्यात आली असून रावेत मधून हिंजवडी आणि पिंपरी साठी नवीन बस सेवा चालवण्याचा निर्णय झालेला आहे. यामुळे रावेत परिसरात राहणाऱ्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. नोकरदार मंडळी साठी पीएमपीएल चा हा निर्णय नक्कीच फायद्याचा राहील.

खरंतर बस उपलब्ध नसल्याने रावेत मधील कर्मचारी वर्गाला हिंजवडीला जाताना प्रथम डांगे चौक आणि तिथून पुढे हिंजवडी असा प्रवास करावा लागत होता. यामुळे प्रवासासाठी जास्तीचे पैसे आणि वेळ तर लागत होता आणि दोन वेळा गाडी बदलावी लागल्यामुळे दमछाक सुद्धा होत होती.

मात्र आता रावेतमधून 375 क्रमांकाची बस हिंजवडी आणि फेज 3 साठी उपलब्ध करून दिली. तसेच रावेतहून पिंपरीला येण्‍यासाठी 13 क्रमांकाची बस सुरू करण्‍याचा निर्णय घेतला आहे. नक्कीच पीएमपीएल प्रशासनाने घेतलेला हा निर्णय रावेत परिसरातील नागरिकांसाठी फायद्याचा राहणार आहे यात शन्काच नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe