Mauli Gavane Murder : माझ्या लेकराने असा काय गुन्हा केला होतो कि, त्याची निघृण हत्या केली ?

Published on -

Mauli Gavane Murder News : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे – तुटलेल्या अवस्थेत विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पाच दिवसानंतर १५ मार्च रोजी पटली. दाणेवाडी गावातील दुसऱ्या – विहिरीत पोत्यात शरीराचे इतर – अवयव सापडले.

ते अवयव माऊली सतीश गव्हाणे याचे आसल्याचा दुजोरा मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी दिला. परंतु बेलवंडी पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. माऊलीच्या कानातील बाळीवरून आईने हा मृतदेह माऊलीचा असल्याचे सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते दौलत शितोळे हे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. पोलिस प्रशासन सहकार्य करत नाही. दुसऱ्या आजूबाजूच्या विहिरीत तपासणी करावी, अशी मागणी केली.

परंतु बेलवंडी पोलिस सांगते की, आम्हाला आपत्ती व्यवस्थापन टीम भेटत नाहीत. ती फक्त नैसर्गिक आपत्ती आल्यावरच येते, असे सांगत आहेत. यावर दौलत शितोळे यांनी स्वतःची २२ जणांची आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पाठवली.

आजूबाजूच्या विहिरीत शोध घेतला. त्या टिमला शेजारील एका विहिरीत एक गाठोडे सापडले. त्या गाठोड्यातून दुर्गंधी येत होती. गाठोड्यात मृताचे शीर, एक पाय, दोन हात सापडले. कानामध्ये असलेल्या बाळीमुळे आई व वडिलांनी हा मृतदेह माऊलीचा असल्याचे ओळखले. यावर त्यांनी एकच टाहो फोडला.

माझ्या लेकराने असा काय गुन्हा केला होतो कि, त्याची निघृण हत्या केली, असे वडिलांनी रडताना सांगितले. या निघृण हत्त्येचा तपास लवकरात लवकर करावा, अशी मागणी दाणेवाडी ग्रामस्थ व सकल गोपाळ समाजाने केली.

अन्यथा नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. स्थानिक पोलिसांवर आमचा विश्वास नाही. या घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, अशी मागणी यावेळी आई-वडिल व नातेवाईकांनी केली. दरम्यान, मृत तरुणाच्या आई-वडिलांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe