Ahilyanagar News : पुन्हा एकदा विटंबना, मूर्तीची तोडफोड ! अहिल्यानगरमधील ‘या’ गावात असंतोष

Published on -

पुणतांबा या दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्री असलेल्या मंदिरांतील मूर्तीची तोडफोड होण्याचे प्रकार थांबता थांबेनात. येथे पुन्हा अहिल्यादेवी घाट परिसरातील श्री दत्तगुरुंच्या मूर्तीची विटंबना झाली आहे. मात्र या मूर्तीला कोणी जाणीवपूर्वक धोका पोहोचवला की दुर्लक्षित कारणामुळे ही मूर्ती विटंबित झाली, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पाठीमागे डिसेंबर महिन्यात  पुणतांबा येथील गोदावरी तीरावर असलेले घृष्णेश्वर महादेव मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याची घटना घडली होती.

त्यानंतर काही दिवसांतच बजरंग बली मंदिराचीही विटंबना काही अज्ञातांकडून झाल्याचे समोर आलं. २३ डिसेंबर २०२४ रोजी पुणतांबा येथील घृष्णेश्वर महादेव मंदिरामध्ये मंदिरातील नंदी व महादेवाच्या पिंडीची विटंबना झाल्याची घटना घडली होती. यामुळे सध्या नागरिकांत असंतोष असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, डिसेंबर मध्ये जी विटंबनेची घटना घडली होती ती विटंबना करणारा मनोरुग्ण असल्याचाचे पोलिसांनी सांगितले होते.

सातत्याने होणाऱ्या घटनांमागे नक्की कोण ?
आज श्री दत्तगुरूंच्या मूर्तीच्या विटंबनेमुळे हिंदू समाजात असंतोष आहे. पुणतांब्यामध्ये वारंवार होणाऱ्या या घटनांमागे नक्की कोण आहे, याचा लवकर तपास करावा, अशी मागणी यावेळी संतप्त हिंदू समाजाने केली आहे. धार्मिक भावना  दुखावल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावून जातीय तेढ निर्माण करण्याचा काही समाजकंटकांचा डाव असून अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

मनोरुग्णास हिंदुंचीच मंदिरे दिसतात ?
डिसेंबरमध्ये झालेल्या अशाच प्रकारामागे मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. आरोपी जर मनोरुग्ण आहे, तर त्याला फक्त हिंदूंचीचं धार्मिक ठिकाणे, मंदिर विटंबना करण्यासाठी दिसतात का, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe