20 हजार, 30 हजार आणि 40 हजार महिना असणाऱ्या नोकरदाराला किती Home Loan मिळणार ? पहा….

होम लोन घेऊन घर निर्मिती करू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाच्या मर्यादा महत्त्वाच्या असतात. पगारानुसार देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडून किती होम लोन मंजूर होणार? याचा आढावा आता आपण घेणार आहोत. पण, महिन्याच्या पगारानुसार एसबीआय कडून किती कर्ज मिळू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत.

Published on -

Home Loan : अलीकडे घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. वाढती लोकसंख्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जमिनीचे भाव सातत्याने वाढत आहेत. आता जमिनी देखील फारच कमी शिल्लक राहिल्या आहेत. यामुळे प्रॉपर्टीच्या किमती दिवसेंदिवस वाढत असून अशा महागाईच्या काळात घर खरेदी करायचे म्हणजे फारच अवघड काम आहे.

यामुळे अनेक जण होम लोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत. दरम्यान जर आपणही होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरेतर, होम लोन घेऊन घर निर्मिती करू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाच्या मर्यादा महत्त्वाच्या असतात.

दरम्यान आज आपण वीस हजार, तीस हजार आणि 40,000 पगार असणाऱ्या लोकांना बँकेकडून किती होम लोन मिळू शकतो याचा आढावा घेणार आहोत. पगारानुसार देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडून किती होम लोन मंजूर होणार? याचा आढावा आता आपण घेणार आहोत.

SBI कर्जाची रक्कम ठरवताना विविध घटकांचा विचार केला जातो, जसे की मासिक उत्पन्न, क्रेडिट स्कोअर, विद्यमान कर्जे आणि परतफेडीची क्षमता. पण, महिन्याच्या पगारानुसार एसबीआय कडून किती कर्ज मिळू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत.

सामान्यतः बँका एखाद्या व्यक्तीच्या मासिक उत्पन्नाच्या 40 ते 50 टक्के रक्कम ईएमआयसाठी ग्राह्य धरतात. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न 20,000 रुपये असेल, तर त्याचा किमान 40% म्हणजेच 8,000 रुपये ईएमआयसाठी निश्चित करता येऊ शकतो.

या अंदाजानुसार, व्याजदर आणि मुदतीनुसार बदल होतो, परंतु साधारणतः 15-20 वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे 15 ते 20 लाख रुपयांपर्यंतचे लोन मिळू शकते. जर मासिक उत्पन्न 30,000 रुपये असेल, तर 12,000 रुपये पर्यंतचा ईएमआय परवडू शकतो. यावर आधारित, 20-25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होऊ शकते.

तसेच, 40,000 रुपये मासिक वेतन असणाऱ्या व्यक्तीसाठी 16,000 रुपये ईएमआयसाठी निश्चित केले, तर 30-35 लाख रुपये होम लोन मिळण्याची शक्यता असते. यामध्ये काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. कर्ज घेणाऱ्याचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असल्यास अधिक लाभ मिळतो. तसेच, जर कोणतेही अन्य कर्ज नसले, तर परतफेड करण्याची क्षमता अधिक चांगली ठरते.

नोकरीतील स्थिरता आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन बँक कर्जाची अंतिम रक्कम निश्चित करते. त्यामुळे, होम लोन घेण्यापूर्वी आपल्या उत्पन्नाची योग्य गणना करून, ईएमआयचा अंदाज बांधता येतो. पण साधारणतः 40,000 महिन्याचा ज्या व्यक्तीचा पगार असेल त्याला एसबीआय कडून 30 ते 35 लाख रुपयांचे होम लोन मिळू शकते. मात्र हा एक अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe