6 वर्ष 3 महिने काम केलं असेल आणि शेवटचा पगार 37 हजार असेल तर किती Gratuity मिळणार ? ग्रॅच्युइटीचे नियम कसे आहेत?

सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून ग्रॅज्युईटीची रक्कम दिली जाते. ग्रॅच्युइटीची रक्कम सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी फायद्याची ठरते. मात्र अनेकांच्या माध्यमातून त्यांना नेमकी किती ग्रॅच्युईटी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातो. खरे तर ग्रॅच्युईटीची रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या पगारावरून आणि त्यांच्या सेवा कालावधीनुसार ठरत असते.

Updated on -

Gratuity Money 2025 : तुम्हीही एखाद्या कंपनीत काम करता का? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खास ठरणार आहे. आज आपण कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅच्युईटी बाबत जाणून घेणार आहोत. कर्मचाऱ्यांना एका ठराविक कालावधीपर्यंत काम केल्याच्या मोबदल्यात कंपनीकडून ग्रॅच्युईटी दिली जाते. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून ग्रॅज्युईटीची रक्कम दिली जाते.

ग्रॅच्युइटीची रक्कम सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी फायद्याची ठरते. यामुळे उतार वयात कर्मचाऱ्यांकडे पैसा उपलब्ध होतो. परिणामी संसारातील सर्व छोट्या मोठ्या गरजा पूर्ण होतात.

खरं तर एखाद्या कंपनीत मग ती कंपनी सरकारी असो किंवा खाजगी त्या कंपनीत दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून ग्रॅज्युईटीची रक्कम दिली जात असते. मात्र अनेकांच्या माध्यमातून त्यांना नेमकी किती ग्रॅच्युईटी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातो.

खरे तर ग्रॅच्युईटीची रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या पगारावरून आणि त्यांच्या सेवा कालावधीनुसार ठरत असते. जे कर्मचारी एकाच कंपनीत सलग पाच वर्षे काम करतात त्यांना ग्रॅच्युइटी मिळते.

जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याने चार वर्षे आणि आठ महिने एखाद्या कंपनीत काम केले असेल तर तो ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र ठरतो कारण की अशावेळी सेवा कालावधी पाच वर्ष समजला जातो.

पण जर चार वर्षे आणि 8 महिन्यांपेक्षा कमी काम केले असेल तर अशावेळी ग्रॅच्युइटी मिळणार नाही कारण हा कालावधी फक्त चार वर्षे समजला जाईल. दरम्यान आता आपण सहा वर्ष तीन महिने काम केले असेल आणि शेवटचा पगार 37 हजार रुपये असेल तर अशा कर्मचाऱ्याला किती ग्रॅज्युएटी मिळणार याचे कॅल्क्युलेशन जाणून घेणार आहोत.

किती Gratuity मिळणार?

खरेतर, ग्रॅच्युइटी मोजण्यासाठी एक विशेष सूत्र वापरले जाते. (शेवटचा पगार × सेवा वर्षे × 15) / 26 हे ग्रॅच्युइटीची गणना करण्याचे सूत्र आहे. याच्या मदतीने कोणत्याही कर्मचारी त्यांना किती ग्रॅच्युइटी मिळणार याचा अंदाज घेऊ शकतो.

येथे, शेवटच्या पगाराचा अर्थ म्हणजे मूळ वेतन + महागाई भत्ता (Basic Pay + Dearness Allowance) असा आहे. तसेच सेवा वर्षे म्हणजे संबंधित कंपनीत किती वर्ष काम केले आहे. महत्त्वाचे म्हणजे नोटीस पिरेड देखील सेवा कालावधीत मोजला जातो.

आता या ग्रॅच्युईटीच्या सूत्रानुसार (37,000 × 6 × 15) / 26 = एक लाख 28 हजार 77 रुपये इतकी ग्रॅच्युईटी मिळणार आहे. म्हणजेच, जर तुम्ही 6.3 वर्ष एका कंपनीत सेवा दिली असेल आणि तुमचा शेवटचा मासिक पगार 37 हजार रुपये इतका असेल, तर तुम्हाला एक लाख 28 हजार 77 रुपये इतकी ग्रॅच्युईटी मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe