SBI FD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी विविध कालावधीच्या एफडी योजना ऑफर केल्या जात आहेत. बँक काही स्पेशल एफडी स्कीम देखील चालू केली आहे. चारशे दिवसांची आणि 444 दिवसांची स्पेशल योग्य योजना बँकेकडून चालवली जात असून यातून ग्राहकांना चांगला लाभ सुद्धा मिळाला आहे.
मात्र जर तुम्हाला एक दोन महिन्यांसाठी पैसा गुंतवायचा असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. कारण की बँक चक्क सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीपर्यंतची एफडी योजना ऑफर करते.

दरम्यान आज आपण बँकेच्या 46 दिवसांच्या FD योजनेची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 46 दिवसांच्या एफडी योजनेचे व्याजदर, यात अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार? याच बाबत आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
46 दिवसांच्या एफडीतून किती रिटर्न मिळणार?
ही बँक विविध कालावधीच्या FD वर आपल्या ग्राहकांना साडेतीन टक्क्यांपासून ते 7.25 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कडून 46 दिवसांची सुद्धा एफडी ऑफर केली जात असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमाल सहा टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळते.
जर समजा एसबीआयच्या या 46 दिवसांच्या फिक्स डिपॉझिट योजनेमध्ये सामान्य ग्राहकांनी म्हणजेच ज्या ग्राहकांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे अशा ग्राहकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 5.50% दराने परतावा मिळतो.
पण जर समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकाने म्हणजेच ज्या ग्राहकाचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा ग्राहकांनी यामध्ये गुंतवणूक केली तर त्यांना 0.50% अतिरिक्त व्याज मिळते. सीनियर सिटीजन ग्राहकांनी 46 दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांना सहा टक्के दराने रिटर्न दिले जातात.
अर्थातच सामान्य ग्राहकांच्या तुलनेत सिनियर सिटीजन ग्राहकांसाठी ही योजना अधिक फायद्याची ठरणार आहे. नक्कीच ज्या लोकांना कमी दिवसासाठी पैसा गुंतवायचा असेल त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची राहील.
अडीच लाख गुंतवल्यास किती रिटर्न मिळणार?
सामान्य ग्राहकांनी 46 दिवसांच्या एफडी योजनेत अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्यांना 5.50% व्याजदराने दोन लाख 51 हजार 727 रुपये मिळणार आहेत.
अर्थातच 1 हजार 727 रुपये त्यांना रिटर्न मिळतील. जर याच एफडी योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी अडीच लाख रुपये गुंतवले तर त्यांना दोन लाख 51 हजार 883 रुपये मिळणार आहेत. अर्थातच 1 हजार 883 रुपये त्यांना व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.